आझाद चौकात निंबाचे झाड पडल्याने ३ दुकानांचे नुकसान.. रात्रीही प्रशासकीय व पोलीस विभाग मदतीसाठी दिमतीला

 


आझाद चौकात निंबाचे झाड पडल्याने ३ दुकानांचे नुकसान..  रात्रीही प्रशासकीय व पोलीस विभाग मदतीसाठी दिमतीला


चोपडादि.१८(प्रतिनिधी ): शहरात आझाद चौक भागात आज दि.१८मे २०२५रोजी संध्याकाळी 06.00 वाजेच्या सुमारास कडुनिंबाचे झाडाची फांदी अचानक पडून तीन-चार दुकानांचे नुकसान झाले असून  सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रहदारीस रस्ता मोकळा करून धोकादायक फांद्या व तुटून पडलेल्या फांद्या बाजुला करुन  विद्यूत तार जोडण्याचं काम संबंधितांकडून करून घेतले.
घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, नायब तहसीलदार योगेश पाटील, मंडळ अधिकारी मनोज साळुंखे, ग्राम महसूल अधिकारी नईम तडवी यांनी उपस्थित राहून नुकसानाबाबत अंदाज घेतला. स्थानिकांच्या तसेच प्रशासनाच्या मदतीने झाड हटवण्याचे कामास सुरुवात करून लवकर रहदारीस रस्ता मोकळा करण्याची कामगिरी निभावली. दरम्यान प्रशासन अधिकाऱ्यांचा हजरजबाबीपणा मुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने