चोपडा तालुक्यात सनपुले भागात केळी पिकाचे प्रचंड नुकसान.. नागलवाडी शिवारात निंबाचे झाड पडून म्हैशीचा मृत्यू
चोपडादि.१८(प्रतिनिधी)तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने जोरदार थैमान घातले असून तालुक्यात कठोरा, सनपुले भागात केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर नागलवाडी येथील एका शेतकऱ्याची म्हैस निंबाचे झाड पडून मृत्यूमुखी पडली आहे.तर शहराच्या काही भागांमध्ये वृक्ष कोलमडून पडल्याच्या घटना आहेत.
काल संध्याकाळी अचानक विजांच्या कडकडाट व वादळासह जोरदार पावसात सुरुवात झाली होती त्यात तालुक्यातील कठोरा, सनपुले ,गोरगावले आदी भागातील बऱ्याचशा शेतातील केळी पिकांचे नुकसान झाले आहे त्यात केळी जमीन ध्वस्त झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे तसेच शहरातील नागलवाडी रस्त्यालगत हिरामण रतन माळी यांची म्हैस कडुनिंबाचे झाड पडल्याने मयत होऊन नुकसान झाले आहे. या म्हशी ची किंमत लाखाच्या घरात असल्याने शेतकरी राजा पुर्ण हवालदिल झाला आहे.प्रशासकिय यंत्रणेमार्फत पंचनाम्याचे काम जलद गतीने होत असून शासन नियमात बसणाऱ्यांना योग्य ती भरपाई मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वादळात बरेचशी झाडे कोसळल्याने विदयूत तारा तुटून पडल्याने मध्यरात्री पर्यंत अंधाराचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान कठोरा भागात अर्धा एक गुंठ्याचे पलीकडे नुकसान झाले नसून काही शेतकऱ्यांचे पाच पाच दहा झाडांच्या झाडांना हानी पोहोचले आहे तलाठी नितीन मनोरे यांनी फेरफटका मारून या झाडाचा पंचनामा केलेला आहे तर सनपुले भागातील तलाठी रवींद्र लढे यांनी दिलेल्या माहितीनुसार संनपुले येथील 21 शेतकऱ्यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे जवळपास 88.46 एवढा क्षेत्रफळात नुकसानीचा अंदाज आहे त्यात सनपुले शेतकरी
लालचंद नामदेव मोरे,दशरथ भिका मोरे,सखुबाई गोपाल पाटील यांच्यासह २१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले. तसे पंचनाम्याचे काम सुरू आहे.