सत्करार्थी मान्यवर,

  वडगांव बु ग्रामपंचायत तर्फे चौघांचा सत्कार 


चोपडा दि.18(प्रतिनिधी) : तालुक्यातील वडगाव बुद्रुक ग्रामपंचायत मार्फत चंदन पाटील, विजय देशमुख, राजू  पाटील व सुनील पाटील यांचा सत्कार उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.

हा  पुरस्कारा हे आमचे भाग्य असून फार मोठा सन्मान कर्मभूमीतून झाल्याचे चंदन पाटील यांनी म्हटले आहे तर कार्यक्रम हा छोटा खाणी नसून तर भव्यदिव्य सन्मान आहे व सन्मानाने आम्हांला पुढे काम करण्याची स्फुर्ती आणि प्रेरणेची ऊर्जा प्राप्ती होईल अशी भावना विजय देशमुख यांनी व्यक्त केली.

वडगांव बु चे भूमिपुत्र राजुभाऊ सोनवणे हे मूख्य कार्यकारी जि.प.जळगाव यांचे स्विय सहाय्यक असून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून जिप गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल,तसेच राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनील सपकाळे सर यांचा तर वडगांव बु येथे जिप मराठी शाळेतील उपशिक्षक चंदन पाटील यांना देखील त्यांच्या लेखनाच्या,काव्याच्या व  शैलीच्या कौशल्याने शिवछत्रपती स्टोरीमिरर या पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल आणि विजय देशमुख यांचा पदोन्नती बद्द्ल  ग्रामपंचायत वडगांव बु. च्या वतीने.. सन्मान चिन्ह, शाल-नारळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नवनियुक्त सरपंच-प्रतिभा गणेश पाटील हे होते, व्यासपीठावर उपसरपंच-राकेश पाटील, ग्राम पंचायत सदस्य-दिपक प्रताप पाटील, ग्रामपंचायत अधिकारी-के.एम.पाटील, माजी सरपंच-कडू बारकू कोळी,गणेश पाटील, सर्व आजी-माजी सदस्य व  ग्रामस्थ यांच्या उपस्थित होते.

ग्रामस्थ आणि सत्करार्थी मान्यवरांसह सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी विजय पाटील यांनी लोकनियुक्त सरपंच , सदस्य, ग्राम पंचायत अधिकारी, सत्कारार्थी तथा समस्थ ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच,सदस्य, सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने