चोपडा - लासुर भरधाव बसच्या भीषण अपघातात २ जण ठार ; २ जखमी.. थरारक अपघाताने लोकांत थरकाप

 

चोपडा - लासुर भरधाव बसच्या  भीषण अपघातात २ जण ठार ; २ जखमी.. मोटारसायकल ओढत नेल्याचे चित्र बघत अनेक जण भयभीत 



चोपडा दि.२०(प्रतिनिधी)चोपडा आगाराची लासुर वरून येणाऱ्या भरधाव बसणे मोटरसायकल व पादचाऱ्यांना दिलेल्या जबर धडकेत दोन जण जागीच ठार झाले अन्य  दोन जण जखमी झाल्याची घटना मनियार अळी  मस्जिद  जवळ घडली.  गाडी एवढी जोरात होती की मोटार सायकलला  मशिदी पासून  मास्टर टेलर्स दुकानापर्यंत ओढत नेल्याचे सांगण्यात येत आहे. बहुतेक ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला असण्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चोपडा आगाराचा चालक दीपक पाटील हा आपल्या ताब्यातील बस (क्रमांक एम एच 40 एन 98 28) ही  लासुर येथून परतीवर  भरधाव वेगाने येत असतांना   शहरातील थाळनेर दरवाजाजवळ मोटारसायकल व पादचाऱ्यांना जोरदार धडक देत धावत होती मोटरसायकल सायकल(क्रमांक एम एच.१९डीएक्स ०१९८) बऱ्याच अंतरापर्यंत ओढत नेल्याने मोटारसायकलस्वार  रविंद्र भाईदास बहारे रा .चुंचाळे हा गंभीर झाला  उपचाराला दरम्यान त्याची प्राण ज्योत मालवली .तर शेख सोनू ऊर्फ शेख रईस शे.रहिम (वय २३)  हा  जागीच गतप्राण झाला आहे.  तसेच   शेख शाकीर शेख साबीर रा.बारगन अळी व सौ .अनिता रविंद्र बहारे (वय 35 )राहणार चुंचाळे  ही महिला जखमी झाली आहे.
याप्रकरणी डॉक्टर प्रसाद पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ऑब्लिक 2025 कलम 194 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किरण शिंपी करीत आहे .मयताचे नातेवाईक आल्यावर गुन्हा नोंदविण्याचे काम होईल अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.
*घटनास्थळी भेट*
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी भेट दिली आहे
*आमदारांची रुग्णालयात धाव शांतता राखण्याचे आवाहन*
आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना व पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या तसेच मयताच्या नातेवाईकांची व जखमींच्या नातेवाईकांचे समजूत घातली. या घटनेची सत्यता लवकरच बाहेर येईल तोपर्यंत कोणीही अफवांना बळी पुढे पडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले .शहरातली शांतता कायम राखावी यासाठी प्रसार माध्यमांनी ही योग्य ती बाजू मांडून शांततेसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन करून पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या कानावर सर्व माहिती टाकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील माजी नगरसेवक महेंद्र धनगर माजी उपनगराध्यक्ष मेहमूद बागवान, मझहर सय्यद, विकास पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने