मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेतंर्गत कर्मवीर भाऊराव पाटील पाटील विद्यालयाचा द्वितीय क्रमांक..२ लाखाचे बक्षीस पटकाविले
वसई ता.पालघर दि.१(प्रतिनिधी)वसई तालुक्यातील रयत शिक्षण संस्था संचलित जुचूंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाने तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावित दोन लाख रुपयांचे बक्षीसाचे मानकरी ठरले आहे.शाळेने शिक्षण क्षेत्रातील उत्तूंग आघाडी कायम राखत पुन्हा मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने चालू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजने अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत विद्यालयाने संपूर्ण वसई तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्याबद्दल दोन लाख रूपयाची रोख रक्कम पुरस्काराच्या स्वरूपात शासनातर्फे विद्यालयाला देण्यात येणार आहे.
या यशाबद्दल पालकांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व सेवकवर्ग व विद्यार्थ्यांचे जोरदार अभिनंदन केले आहे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम शंकर पाटील, उपाध्यक्ष, सर्व सदस्य - स्थानिक सल्लागार समिती, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र यांनी केले आहे.