जुचूंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या 36 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

 

जुचूंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या 36 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश..


वसई ता.पालघर दि.१(प्रतिनिधी)वसई तालुक्यातील रयत शिक्षण संस्था संचलित जुचूंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस.पी.ज्युनिअर कॉलेजच्या इ. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 25 मध्ये विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे यात 36 विद्यार्थ्यांनी यश संपादित करीत शाळेच्या नावलौकिक वाढविले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परिसरात इतक्या मोठ्या संख्येने उत्तीर्ण होणारी एकमेव शाळा असल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे. यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवी वर्ग गटातून 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात 19 विद्यार्थिनींनी तर सात विद्यार्थ्यांनी चमक दाखवले आहे तर इयत्ता पाचवी गटातून आठ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर दोन मुलांना बाजीमारता आली आहे.

*इयत्ता आठवी वर्गातून शिष्यवृत्ती उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे :* दृष्टी सं.मोरे, कृपाली ध. पाटील, जान्हवी ग. राठोड, गौरी की. शिंदे, उर्मि ज. गुरव, तनिष्का यो. देसाई, सुषमा र .राठोड, श्रुती मि. आडोळे ,पूर्वा तू लाड, विधी दु. म्हात्रे ,वल्लारी स. म्हात्रे, ध्रुव दे.भोस्कर ,विशाल स.कदम, यश शै. नवले ,श्लोक ते. राठोड, जानवी नि.माळी, तुलसी न मसने साक्षी गो गिराने, स्मित म. भोस्कर, विद्या ता. पगारे ,खुशी ध .राजपुर, जीविका सं. शिंदे निखिल रा.मोहिते ,सिद्धी स.पाटील ,नर्मदा प्र, राजपूत मल्हार अं.मासाळ
*इयत्ता पाचवी वर्गातून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी असे*: तुळशी सं आंबेकर ,राशी र .पुसांडे, सिद्धी कि. शिंदे, संध्या मौर्या ,प्रांजल अं. नारकर ,साक्षी म.म्हात्रे, सोनी चं शर्मा, अपेक्षा अ सूर्यवंशी, तेजस मि. मानकर, स्वराज श्या. धावडे
या यशाबद्दल पालकांनी
विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व सेवकवर्ग व विद्यार्थ्यांचे जोरदार अभिनंदन केले आहे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम शंकर पाटील,  जनरल बॉडी सदस्य श्री विनय गोपी किसन पाटील प्राचार्य श्री व्ही यु जगताप,उपाध्यक्ष, सर्व सदस्य - स्थानिक सल्लागार समिती, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने