भाजपा तालुका अध्यक्ष पिंटु पावरा यांचे नागलवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
चोपडा,दि.२९(प्रतिनिधी)तालुक्यातील नागलवाडी येथे दि .२८ एप्रिल रोजी चोपडा पुर्व भाजपाचे तालुका अध्यक्ष श्री पिंटु गुलसिंग पावरा यांचा जाहीर सत्कार समारोह नुकताच संपन्न झाला.
सर्व प्रथम गावातील मारूती मंदिरात भगवान बजरंग बली च्या मूर्तीस माल्यार्पण करून सत्कार समारंभास प्रारंभ करण्यात आला यावेळेस गावातील जेष्ठ नागरिकांनी पिंटु पावरा यास आशिर्वाद दिले पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रमोद राजपुत, नितिन राजपुत,निलेश राजपुत, धर्मदास पाटील,वसंत महाजन, राजेंद्र पाटील,भावेश राजपुत, दिपक भोसले,प्रमोद बारेला,या सह असंख्य नागरिक उपस्थित होते