पुनगांव विकास सोसायटीवर भाजपाचा झेंडा.. चेअरमनपदी मगन बाविस्कर तर व्हाय.चेअरमनपदी गोकुळ सपकाळे बिनविरोध निवड

 पुनगांव विकास सोसायटीवर भाजपाचा झेंडा.. चेअरमनपदी मगन बाविस्कर तर व्हाय.चेअरमनपदी गोकुळ सपकाळे बिनविरोध निवड

चोपडा,दि.२८(प्रतिनिधी)जळगाव जिल्हा  भारतीय जनता पार्टीचे अनुचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष  तथा भाजपाचे कणखर एकनिष्ठ कार्यकर्ते मगन बाविस्कर यांची पुनगांव विकास सोसायटी चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली आहे तर व्हाईस चेअरमन पदी गोकुळ सपकाळे यांची वर्णी लागली आहे त्यामुळे या गावात भाजपाचाच  बोलबाला असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. 

पुनगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडीत विरोधी पॅनलचा दणदणीत प्रभाव करत मगन बाविस्कर सरांच्या पॅनेलने एकतर्फी सत्ता काबीज केली आहे जवळपास 11 सदस्य निवडून आले आहेत.त्यात किशोर बाविस्कर, जनार्दन दादा बाविस्कर, संजय बाविस्कर,निवृत्ती बाविस्कर,छगन सोनवणे,गोकूळ सोनवणे,साहेबराव दादा बाविस्कर,संजय बाविस्कर,मंगलाबाई संतोष बाविस्कर ,कस्तुराबाई गोविंदा बाविस्कर यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित चेअरमन मगन बाविस्कर सर यांचे  घराण्याची राजकीय कारकीर्द जोमात असून त्यांचे वडील मुरलीधर बाविस्कर हे देखील भाजपाचे खंदे कार्यकर्ते असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आहेत तर त्यांचे बंधू किशोर बाविस्कर हे देखील पुनगावचे भाजपाचे सरपंच आहेत. श्री मगन बाविस्कर हे सन 1998 पासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून गावागावात भाजप कणखर करण्यासाठी त्यांनी आपली कस पणाला लावली आहे.त्यांच्या विजयाबद्दल  तालुक्याभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांनी  भाजपाच्या मोड बांधणे कामी गोर गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आगळें वेगळे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर केले आहे. त्यांचे सक्रिय कार्य पाहून  गावभलं होईल या विचाराने गावकऱ्यांनी यशाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने