जळगावचे प्रल्हाद सोनवणे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्काराने गौरव

  

जळगावचे  प्रल्हाद सोनवणे  यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्काराने गौरव 

जळगाव दि.२७(प्रतिनिधी)डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्कार सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशन तफेऀ जळगाव येथील  प्रल्हाद सोनवणे अनुसूचित जनजाती  वंचित आदिवासी कोळी जमातींसाठी करीत असलेले समाजकार्य तसेच ऑटोरिक्षा व विद्यार्थी वाहतुक चालकांच्या विकासासाठी करीत असलेले  कार्य त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम याची दखल घेऊन  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री  श्री रामदासजी आठवले  यांच्या मार्गदर्शनाने सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मीताई कुमावत यांनी २०२५ चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे.

 प्रल्हाद सोनवणे हे आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄति समिती महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष आक्रमक सामाजिक संघटना सचिव अशा विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत .प्रल्हाद सोनवणे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने