चोपडा तालुक्यातील १२ पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर..५ गण अनुसूचित जमातीसाठी तर अनुसूचित जातीसाठी १ जागा राखीव
चोपडा दि.१३(प्रतिनिधी) नगरपालिका प्रभाग आरक्षण, पंचायत समिती सभापती आरक्षणानंतर आता पंचायत समितीच्या १२ गणाचे आरक्षण अमळनेर उपविभागीय अधिकारी श्री.नितीन कुमार मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब राऊत, नायब तहसीलदार योगेश पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.यावेळी निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. अनुसूचित जातींसाठी एक तर अनुसूचित जमाती साठी पाच गण आरक्षित झाले आहेत.त्यातच नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी ३ तर सर्वसाधारण ३ जागा राखीव झाल्या आहेत.
आरक्षित गण निहाय जागा पुढीलप्रमाणे
♦️1-नागलवाडी : अनु.जमाती
♦️2-विरवाडे. :अनु.जमाती (स्त्री)
♦️3-धानोरा प्र. अ:अनु. जमाती (स्त्री)
♦️4-मंगरुळ : अनु.जाती (स्त्री)
♦️5-अडावद : ना.मा.प्र. (स्त्री)
♦️6-वर्डी : ना.मा.प्र.
♦️7-अकुलखेडा : सर्वसाधारण
♦️8-लासुर : सर्वसाधारण
♦️9-गणपूर : अनु.जमाती
♦️10-घोडगाव : सर्वसाधारण
♦️11-चहार्डी : ना.मा.प्र. (स्त्री)
♦️12-गोरगावले बु.: अनु.जमाती (स्त्री)