चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलंगी सबयार्डात प्रथमच भुसार मालाच्या जाहीर लिलावास प्रारंभ

 

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलंगी सबयार्डात प्रथमच भुसार मालाच्या जाहीर लिलावास प्रारंभ


चोपडा दि.१३(प्रतिनिधी) : दिनांक १३/१०/२०२५ वार सोमवार रोजी चोपडा तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार  आण्णासो चंद्रकांत सोनवणे व  माजी आमदार सौ. लताताई सोनवणे ह्यांच्या  मार्गदर्शनाने चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गलंगी सबयार्डात लिलावाचा शुभारंभ सभापती श्री. नरेंद्र पाटील ह्यांचे हस्ते नारळ फोडून  भुसार मालाच्या पहिल्या जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. माल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यांत आला सदर सबयार्डात लिलाव सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे यापूर्वी गलंगी परिसरातील शेतकऱ्यांना आपला भुसार माल विक्रीसाठी अमळनेर, शिरपुर बाजार समितीस घेवून जावा लागत होता. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीवर मोठा खर्च होत असे, तसेच वेळेचाही अपव्यय होत होता. चोपडा बाजार समितीच्या गलंगी सबयार्डात लिलाव सुरू झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून त्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च वाचणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून जवळच्या गलंगी सबयार्डात येथे माल विक्री करता येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंद व्यक्त होत आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती श्री नरेंद्र वसंतराव पाटील यांनी सांगितले की, "गलंगी सबयार्डात लिलाव सुरू करणे हे बाजार समितीचे उद्दिष्ट होते.  आमदार  श्री.  चंद्रकांत सोनवणे ह्याचें नेतृत्वाने व मार्गदर्शनाने आज हा दिवस शेतकरी, व्यापारी ह्यांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्व संचालक ह्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे. यामुळे गलंगी परिसरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे." तसेच सबयार्डाच्या विकासालाही चालना मिळणार असून, भविष्यात येथे अधिक सुविधा उपलब्ध होतील व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला शेतमाल गलंगी सबयार्डात विक्रीस आणावा असे आवाहन केले. तसेच श्री. घनःश्याम पाटील श्री. शिवराज पाटील ह्यांनी  मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती श्री नरेंद्र पाटील, उपसभापती श्री. विनायकराव चव्हाण, संचालक श्री. घनःश्याम पाटील, श्री. अनिल पाटील, श्री. वसंत पाटील (रावसाहेब), श्री. विजय पाटील, श्री. नंदकिशोर पाटील, श्री. शिवराज पाटील, श्री. मनोज सनेर (विक्की डाँ), श्री. मिलींद पाटील, श्री. किरण देवराज, श्री. सुनिल जैन, श्री. सुनिल अग्रवाल, श्री. नितीन पाटील श्री. भरत पाटील व सचिव श्री. रोहिदास सोनवणे, कर्मचारी वर्ग तसेच गलंगी परिसरातील मान्यवर शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने