जळगाव मनपा हद्दीतील प्रभाग २ मधील झोपडपट्टीधारकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी ..माजी नगरसेवक किशोर बाविस्कर व नगरसेविका उज्वला बाविस्कर व गोपाल मिस्तर यांच्या पाठपुराव्याला यश

 जळगाव मनपा हद्दीतील प्रभाग २ मधील झोपडपट्टीधारकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी ..माजी नगरसेवक किशोर बाविस्कर व नगरसेविका उज्वला बाविस्कर व गोपाल मिस्तर यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव दि.१४(प्रतिनिधी): शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील वाल्मीक नगर, कांचन नगर  परिसरातील झोपडपट्टी भागात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. सदर परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे म्हणून माजी नगरसेवक किशोर बाविस्कर, माजी नगरसेविका उज्वालाताई बाविस्कर व गोपाल मिस्तरी यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला.

महानगरपालिकेच्या  अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा होवून वाल्मीक नगर, असोदा रोड प्रभाग २ परिसरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांना महापालिकेतर्फे घरपट्टी आकारण्यात आली असून लवकरच या भागात नागरिकांसाठी अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात येणार असून त्यांना कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर नागरिकांना नळ कनेक्शन मिळणार असल्यामुळे या भागातील रहिवाश्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने