श्री. बटेसिंगभैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातील मुलींची एल.एल.बी व एल.एल.एम परीक्षेत विद्यापीठात बाजी

 श्री. बटेसिंगभैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातील मुलींची एल.एल.बी व एल.एल.एम परीक्षेत विद्यापीठात बाजी


नंदुरबारदि.१३(प्रतिनिधी)नंदुरबार तालुका विधायक समिती संचलीत श्री बटेसिंगभैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था नंदुरबार येथील उन्हाळी २०२५ विद्यापीठ परीक्षांमध्ये एलएलबी परीक्षेत जवंजाळकर अनुष्का संजय ही विद्यापीठात प्रथम तर ठाकूर निकिता सुभाष ही विद्यापीठात द्वितीय आलेली आहे. तसेच एलएलएम परीक्षेत चौरे मयुरी सुहास ही विद्यापीठात प्रथम तर पाटील कांचन राजेंद्र ही विद्यापीठात व्दितीय येऊन नंदुरबार महाविद्यालयाचे नावलौकीक करून विद्यापीठात बाजी मारली आहे.

सदर गुणी व उत्तीर्ण विद्यार्थ्यीनीच्या या यशाबद्दल भारताचे माजी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ॲड. राजेंद्र रघुवंशी, संस्थेचे चेअरमन आ.श्री चंद्रकांत रघुवंशी, व्हॉइस चेअरमन श्री मनोज भैय्या रघुवंशी, सचिव श्री यशवंत नाना पाटील सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने