श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना संघटनेवर कोमल पाटलांची निवड
चोपडा दि.१३(प्रतिनिधी)उप मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना संघटना विविध पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेशातील विविध पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे कार्यअध्यक्ष बाबा साहेब चव्हान व महाराष्ट्र राज्य संघटक नानासाहेब बच्छाव यांच्या नेत्तुत्वा खाली कोमल बापूराव पाटील उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष पदी निवड केल्याचे एका पत्रकान्वये कळविले आहे.उपरोक्त निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.