शासकीय बुद्धिबळ स्पर्धेत पंकज विद्यालयाच्या 11 खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड

 शासकीय बुद्धिबळ स्पर्धेत पंकज विद्यालयाच्या 11 खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड




चोपडा,दि.१३(प्रतिनिधी) चोपडा येथे नुकत्याच शासकीय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते, त्यात पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 11 खेळाडूंनी तालुकास्तरावर घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 14 वर्षे वयोगटातील श्रेयश किरण पाटील याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर निवडा झाली. त्यासोबतच वेदांत सुनील चौधरी व  समर्थ सुधीर चौधरी यांनीही चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत.

सतरा वर्ष वयोगटात खुशी तुषार पवार, तेजस्विनी वासुदेव पाटील या विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी करत जिल्हास्तरावर पात्र ठरले आहेत. तर 19 वर्ष वयोगटात शारोन ठाकूर याने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तर सिद्धांत वाघ आणि भावेश पाटील यांचीही निवड झालेली आहे यासोबतच समृद्धी चव्हाण योगिता पवार भाग्यश्री धनगर या विद्यार्थ्यांचीही 19 वर्षे वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेले आहे.

तिन्ही गटात पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत तिहेरी यश संपादन केलेले आहे.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना उदय गुजर सर, अजय सैंदाणे सर आणि इतर सर्व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले

निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व  मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष पंकजभैय्या बोरवली, संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायणदादा बोरोले, भागवत भारंबे, सचिव गोकुळ भोळे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, मुख्याध्यापक व्ही आर पाटील, सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने