खान्देशातील भव्य मोफत वारकरी बालसंस्कार शिबिर 5 में पासून ..
चोपडा दि.२८(प्रतिनिधी)सद्गुरू संत तानाजी महाराज प्रासादिक भव्य मोफत वारकरी बालसंस्कार शिबिर गेल्या 4 वर्षांपासून संतचरणजसेवक महाराष्ट्रातिल नामवंत कथाकार व किर्तनकार महंत प्रा हभप डॉ सुशिलजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपात राबविले जात आहे.५ मे २०२५पासून शिबिरास आव्हाणे ,ता.जळगाव येथे प्रारंभ होत आहे.
या वर्षी देखील आव्हाणे ता जि जळगाव या ठिकाणी असुन विविध तालुक्यातील विध्यार्थी उन्हाळी सुट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या अंगात असलेल्या विविध कलागुणांना वाव देतात किर्तन गायन पखवाज अश्या विविध पध्दतीचे वारकरी शिक्षण या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून देण्यात येते तसेच देव देश धर्म ग्रंथ सोबतच निरवेसनी जिवन जगण्याचा मंत्र देखील या ठिकाणी प्राप्त होतो आतापर्यंत 28 एप्रिल 2025 (60 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झाली आहे व अजुन नावनोंदणी साठी १ में ही अंतिम तारीख असुन हे शिबिर निःशुल्क आहे तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे