चोपड्याचे मयूर जैन यांचे तुफानी सायकलींग

  चोपड्याचे  मयूर जैन यांचे तुफानी सायकलींग 

वो रुकता नही 

 वो थकता नही,

वो तुफान की तरह 

हमेशा आगे आगे बढता है.‌.. 

असं ज्यांच्याबद्दल म्हणावं लागेल ते म्हणजे चोपडा येथील विख्यात प्रिया बेकरीचे चालक-मालक श्री मयूर जैन यांचं सायकलींगचं पॅशन.

अवघ्या आठ ते दहा महिन्यांमध्ये त्यांनी आपल्या सायकलिंगचा आलेख हा उंचावत नेला. शारीरिक सुदृढता आणि आरोग्यासाठी त्यांनी सायकलिंग सुरू केलं ते डिसेंबर 2023 या महिन्यात. आणि सुरुवातीला लहान लहान राइटड्स करून ते अर्धशतकी आणि शतकी राइटड्स कडे झेपावू लागले. रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्या स्वतःच्या बेकरी इंडस्ट्रीमध्ये कार्यभार सांभाळून पहाटे न चुकता साडेतीन वाजेला उठून चार वाजेला राईड सुरू करणे... विशेष म्हणजे एकट्याने, आणि दररोज पहाटे चार ते सकाळचे नऊ वाजेपर्यंत सेंचुरी राइड पूर्ण करून घरी येऊन लगेच आपल्या व्यवसायाला बांधील असणे असा त्यांचा दिनक्रम आहे.

विशेष म्हणजे सायकलिंग करताना चोपड्यापासून चारही दिशेला शंभरकिलोमीटर पर्यंत त्यांनी  सायकलिंग  केले आहे ही बाब उल्लेखनीय वाटते.

आणि नंतर जळगाव सायकलीस्टच्या माध्यमातून, स्वप्निलभाऊ मराठे यांच्या माध्यमातून आणि आमच्या चोपडा सायकलीस्टचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाने श्री. मयुर  जैन यांनी चोपड्यातून *पहिले एस आर* होण्याचा मानही पटकावला आहे. बी आर एम ही स्पर्धा करताना 200, 300, 400 आणि 600 किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो. तो त्यांनी विक्रमी वेळेत लिलया पार करून चोपड्याच्या क्रीडा -सांस्कृतिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला  आहे.

अतिशय कमी वयात आणि कमी कालावधीमध्ये त्यांनी बी आर एम ही स्पर्धा पूर्ण केल्यामुळे नवोदित सायकप्रेमींना, क्रीडाप्रेमींना ते एक प्रेरणास्रोत ठरत आहेत.

सायकलिंग सोबत पोहणे, जिम करणे, रनिंग, रन-वॉक-रन, ट्रेकिंग यासारख्या क्रीडा प्रकारातही ते रस घेत असतात. दररोज वेळ देत असतात. त्यांच्या या यशामागे त्यांचे संपूर्ण कुटुंब, मित्रपरिवार यांचाही मोठा सहभाग आहे असं ते प्रामाणिकपणे मान्य करतात.श्री मयूरभाई जैन यांना यापुढील काळात घवघवीत भवितव्यासाठी, वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.त्यांचं हे सायकलिंग आणि मल्टिपल स्पोर्ट्सविषयीचं हे प्रेम असंच वृद्धिंगत होत राहो, वेगवेगळी मानांकने त्यांना प्राप्त होवोत,आणि ही *चोपडा एक्सप्रेस* अशीच भन्नाट धावत राहो हीच शुभेच्छा देऊन थांबतो.

शब्दांकन,

प्रशांत गुरव‌.

चोपडा सायकलिस्ट





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने