विल्हाळे येथील ' ऐतिहासिक वास्तू 'चे जतन व्हावे : जयसिंग वाघ

 विल्हाळे येथील ' ऐतिहासिक वास्तू 'चे जतन व्हावे : जयसिंग वाघ


भूसावळ दि.२६(प्रतिनिधी): -  भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथील ऐतिहासिक वास्तू आज मोठ्याप्रमाणात जीर्ण झाली असली तरी यातील यक्ष अजिंठा लेणीची आठवण करून देतात , यातील ३२ स्तंभ विविध प्रकारच्या कोरीव कामांनी आजही उठावदार दिसतात , वास्तूची भव्यता इतिहासाची जशी साक्ष देत आहे  त्याच प्रमाणे कुण्या राजाचे इथे वास्तव्य राहिले असावे असे वाटते त्यामुळे या वास्तूचे  जतन करणे गरजेचे आहे  असे प्रतिपादन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. 

      २५ सप्टेंबर रोजी वाघ यांनी विल्हाळे येथील या ऐतिहासिक वास्तूस भेट दिली असता त्यांनी स्थानिक जनतेशी संवाद साधला असता या वास्तूच्या संवर्धना करीता प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगितले .

       भारतीय इतिहास व संस्कृतीचे अभ्यासक सुभाष वाघ ( मुंबई ) यांनी सदर वास्तूत सभामंडप दिसत असून त्यासमोर द्वारमंडप सुरवातीच्या काळात असावा , इथले नक्षीकाम पाहता दोन ते तीन ठिकाणी मुर्त्यांचे काम राहून गेले असावे असे दिसते , यातील विविध देव देवतांची मूर्ती , अत्यंत कलाकुसरीचे नक्षीकाम पाहता या वास्तूच्या भव्यतेची साक्ष पटते असे प्रतिपादन केले.

        या प्रसंगी नथू अहिरे , अशोक सैंदाणे , विकास वाघ , शंकर पाटील , जोगीलाल सुरवाडे , कचरू सुरवाडे व अन्य उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने