शेतकऱ्यांना शेती साहित्य आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते वितरण

 शेतकऱ्यांना शेती साहित्य आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते वितरण

 चोपडा दि.२७(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने महाडीबीटी प्रणालीवर राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन उत्पादन व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप, नॅनो डीएपी व नॅनो युरियाचे प्रतिनिधी स्वरूपात वाटप करण्यात आले.  आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बॅटरी ऑपरेटेड पंप 904 नॅनो युरिया व नॅनो डीएपी १८०० शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत . निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक ते सर्व कागदपत्र संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करून निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  आमदार सौ .लताताई सोनवणे यांनी भूषविले.तर  प्रमुख पाहुणे  माजी आमदार  श्री चंद्रकांत जी सोनवणे, सभापती श्री नरेद्र पाटील ,धन:श्यामभाऊ अग्रवाल , रावसाहेब पाटील, गोपाल पाटील ,मंगलाताई पाटील ,प्रताप आण्णा, प्रकाश राजपुत ,निवुत्ती पाटील, कैलास बाविस्कर ,ह.भप.गजानन महाराज, संरपच गोरगावले कुणाल पाटील ,नंदु गवळी, प्रविण साळुंखे, व तालुक्यातील योजनेमध्ये निवड झालेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तालुका कृषी अधिकारी श्री दीपक साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी आर एम पाटील, जे यु सोनवणे, व एम वाय महाजन कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने