संघटनेत निवडणूक नाही तर कामाच्या गुणवत्तेवर पद दिले जाते : भावी राज्याध्यक्ष केतनभाई शहा

 संघटनेत निवडणूक नाही तर कामाच्या गुणवत्तेवर पद दिले जाते : भावी राज्याध्यक्ष केतनभाई शहा 

चोपडा,दि.४ ( प्रतिनिधी ) -- भारतात एकमेव संघटना अशी आहे की,निस्वार्थी काम केले जाते संघटनेत निवडणूक नाही तर कामाच्या गुणवत्तेवर पद दिले जाते. त्यामुळेच सामान्य माणसाला देखील पद मिळत असते. फक्त त्याचे कामावर त्याला पद मिळते. संघटना संपूर्ण भारतात बारा राज्यात काम करत आहे परंतु पदावरून कुठेही रस्सीखेच नाही ही बाब भारतीय जैन संघटना साठी मोठी अभिमानास्पद आहे.असे प्रतिपादन भावी राज्य अध्यक्ष केतनभाई शहा यांनी केले.

    चोपडा येथे बोथरा मंगल कार्यालयात ते बोलत होते भावी राज्याध्यक्षा, राज्य सचिव यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या वेळेस त्यांनी चोपडा येथे भेट दिल्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सकल जैन समाजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आले होते.

नुकतेच महाराष्ट्रात नवनिर्वाचित राज्याध्यक्ष केतनभाई शहा, भावी राज्य सचिव . प्रवीण भाऊ पारख .तसेच विद्यमान राज्य सचिव दीपक चोपडा, यांनी खानदेश दौऱ्या अंतर्गत ते चोपडा येथे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  प्रा.शांतीलाल बोथरा,तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष विनय पारख,विभागीय अध्यक्ष अशोक श्रीश्रीमाळ, जैन समाजाचे अध्यक्ष गुलाबचंद देसर्डा, प्रदीप बरडीया,  उपस्थित होते

प्रारंभी नवकार महामंत्राचे स्मरण करुन  सरिता टाटीया व भावना देशलहरा व महिला सदस्यांनी स्वागत गीत सादर केले पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव गौरव कोचर, उपाध्यक्ष  मयंक बरडीया, कोषाध्यक्ष अभय ब्रम्हेचा, प्रोजेक्ट चेअरमन कुशल बुरड, दर्शन देशलहरा यांचे हस्ते करण्यात आले

प्रास्ताविक आदेश बरडीया यांनी केले तर पाहुण्यांच्या परिचय दीपक राखेचा यांनी करून दिले केतनजींनी प्रबोधनात्मक भाषण करत म्हटले की , व्हिजन 1.0 अंतर्गत मागील काही वर्षांमध्ये अडीच लाख मुलांची फाटलेल्या ओठांचे प्लास्टिकसर्जरी करण्यात आली, नाला खोलीकरण चे काम संघटनेच्या हाती घेतल्या असून या योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात 75 टक्के तलाव काठोकाठ भरलेले आहेत

महिला सशक्तिकरण विद्यार्थी सशक्तीकरण झाडे लावा झाडे जगवा, 70 हजार शाळेमध्ये मूल्यवर्धन शिक्षण कार्यक्रम अशा अनेक योजना राबवण्यात आले असून पुढील दोन वर्षाच्या कार्यकाळात संपूर्ण भारतात व्हिजन 2.0 अंतर्गत शंभर जिल्हे पाणी युक्त, जलयुक्त शिवार, मूल्यवर्धित शिक्षणाचे प्रचार व प्रसार या योजना अमलात आणण्यात येणार आहे

वर्तमान राज्य सचिव यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली व संघटनेतर्फे डिजिटल व समाज माध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या योजनांच्या सविस्तर उल्लेख केला भावी राज्य सचिव प्रवीण पारख व खानदेश विभागीय अध्यक्ष अशोक श्रीश्रीमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले

सदर प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आलासोबत कुशल बुरड यांची हस्ती बँकेत स्थानिक सल्लागार समिती चेअरमनपदी निवड झाल्या असता त्यांचे सत्कार करण्यात आलेमयूर राजेंद्र जैन यांनी सलग अडतीस तास सायकलिंग करत सहाशे किलोमीटरचा रस्त्याचे अंतर कापले त्यानिमित्त त्यांच्याही सत्कार करण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने