श्रीमती. शरदचंद्रिका सुरेश पाटील पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात व्याख्यान संपन्न

 श्रीमती. शरदचंद्रिका सुरेश पाटील पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात व्याख्यान संपन्न               

                                                                              चोपडा दि.४(प्रतिनिधी ) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती. शरदचंद्रिका सुरेश पाटील पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात एकदिवशीय प्रेरक व्याख्यान राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान , माउंटअबू  आयोजित मानसिक आरोग्य या विषयावर ३१ ऑगस्ट २०२४ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते  यात राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान चे प्रा.श्री.विकास साळुंके सर यांनी सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य व मनशांती किती महत्वाची आहे व आपले मन व एकाग्रता कशाप्रकारे वाढवता येऊ शकते या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व काही प्रात्यक्षिक प्रयोग देखील विद्यार्थ्यां न कडून करून घेतले व मानसिक एकाग्रते मुळे होणारे फायदे देखील समजावून सांगितले तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महाविद्यालयात वृक्ष रोपणाचा कार्यक्रम देखील  संपन्न झाला. 

सदरील कार्यक्रमास  राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान चे श्री. राजेंद्र पाटील व श्री. पंकज भाई पाटील हे देखील उपस्थित होते. त्याच प्रमाणे महाविद्यालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष सौ. आशाताई पाटील , सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील , प्राचार्य. डॉ. गौतम वडनेरे , प्रबंधक श्री. प्रफुल्ल मोरे विभाग प्रमुख श्री.पियुष चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमला उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने