लासूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

 लासूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

लासूर ता.चोपडा,दि.४(वार्ताहर)- येथे आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून ४० लक्ष निधीतून सामाजिक सभागृह तसेच ८ लक्ष निधीची तरतूद करून वर्ग खोलीचे भूमिपूजन संपन्न झाले.सदर भूमिपूजन सोहळा आ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते तर माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महर्षी वाल्मिकी नगर परिसरात पार पडला.

       तालुक्याचा विकास करत असतांना जात,धर्म हा भेद केला नसून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे याप्रसंगी माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.बुधगाव ते खामखेडा गावापर्यंत तब्बल २१० कोटींच्या कोटींच्या रस्ता मंजूर असून पावसाअभावी काम रखडले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

         यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,मंगलाताई पाटील, विजय पाटील,रावसाहेब पाटील,गणेश पाटील,निवृत्ती पाटील,पप्पू भार्डूकर,ए.के.गंभीर सर,देविलाल बाविस्कर,कैलास बाविस्कर,अन्नू ठाकूर,बी टी बाविस्कर,यांसह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने