भावा .. प्रभाग क्रमांक 2 मध्ये धनुष्यबाणाची हवा..! आमदार व सासऱ्यांच्या सामाजिक कामांची शिदोरी पाठीशी असल्याने सेनेच्या सौ.देवयानी पवन माळी यांचा विजयाचा मार्ग मोकळा.. मतदारच देतायं ग्रीन सिग्नल.. विजय भव् चा आशिर्वाद

 

भावा .. प्रभाग क्रमांक 2 मध्ये धनुष्यबाणाची हवा..!

आमदार व सासऱ्यांच्या  सामाजिक कामांची शिदोरी पाठीशी असल्याने सेनेच्या सौ.देवयानी पवन माळी यांचा विजयाचा मार्ग मोकळा.. मतदारच देतायं ग्रीन सिग्नल.. विजय भव् चा आशिर्वाद

चोपडा दि.१(प्रतिनिधी)चोपडा नगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना पक्षाची हवा जोरात असून या वादळात विरोधक चांगलेच घिरट्या खाऊ लागले आहेत.  प्रभाग अ चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ. देवयानी पवन माळी व प्रभाग ब चे शिवसेनेचे उमेदवार सुरेश मगन बडगुजर याच्या दमदार प्रचाराने कॉलनी परिसरात जिकडे तिकडे धनुष्यबाण.. धनुष्यबाण.. धनुष्यबाण असाच आवाज घुमू लागल्याने दोघांचा उदो उदो मतदार राजा करीत असल्याने त्यांचा विजय पक्का असल्याचे मानले जात आहे.
उमेदवार सौ.देवयानी पवन माळी ह्या सामाजिक कार्यकर्ते दीपक श्रावण महाजन यांच्या सुनबाई असून सासरे दीपक महाजन यांनी  प्रभागात तरुणांसाठी मातीचा "मल्ल आखाडा " तरुणांची मने जिंकली आहेत.त्यातच बोल बजरंग मित्र मंडळाच्या मार्फत भाग्योदयनगर, तारामती नगर, अशोक नगर,महात्मा फुलेनगर,बारगनअळी या भागामध्ये विविध सामाजिक कामे त्यांनी केली आहेत तसेच आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या निधीतूनही बरेच विकास कामे केलेली आहेत या कामांची  शिदोरी सोबत असल्याने त्यांचा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे .
विशेष म्हणजे या प्रभागात जातपात ,धर्म -भेद असला कुठलाही भेद नसून सर्व धर्म एकजुटीच्या भावनेने महाजन परिवार कार्य करीत असते त्यामुळे  त्यांच्याजवळ जनमानसांचा ओघ  सोबतीला आहे.याकारणाने व आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या सहकार्याने मतदार बंधू भगिनींकडून उत्साहपूर्ण पाठिंबा मिळत असल्याने त्यांचा विजयाचे दार खुले असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने