मतदारांच्या मनात मला जागा असल्याने माझा विजय पक्का..भाजप राष्ट्रवादी युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. साधनाताई नितीन चौधरी
चोपडा दि.१(प्रतिनिधी)चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक रिंगणात अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या लढतीत प्रचाराची पातळी खालावली असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून मला मतदारांनी सर्वाधिक पसंती दिली असून माझा विजय पक्का असल्याचा दावा भाजपा राष्ट्रवादी युतीचे नगराध्यक्षदाचे उमेदवार सौ.साधना नितीन चौधरी यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या की ,माझे वडील जीवन भाऊ चौधरी हे शांत,मित स्वभावी व सालास विचारसरणीचे व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या तोंडून कोणाविषयी प्रचारा दरम्यान कोणताही अपशब्द निघालेला नाही.ते शांत स्वभावी राजकारणी म्हणून परिचित आहेत. त्यांचीच मी लेक असून मी ही शांततेने निवडणूक लढवीत आहे .कोणावर आग पाखड न करता मला काय करावयाचे आहे याबद्दलही मी मतदारांना समजावून सांगत आहे. मात्र विरोधक आमच्या अनेक नेत्यांवर जिव्हारी टिका करीत आहे. हे योग्य नसून मतदार राजा सर्व काही जाणून आहे त्यामुळे मला मतदारांनी सर्वाधिक पसंती दिली आहे त्यामुळे माझा विजय पक्का असल्याचा दावा सौ.साधना चौधरी यांनी केला आहे.
