अजितदादा पवार यांच्या हस्ते अरुणभाई गुजराती यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी तर प्रवेश.. माजी सभापती नरहरी झिरवाळ व ना.कोकाटे यांची खास उपस्थिती.. चोपड्यातील कोणी कोणी केला प्रवेश जाणून घ्या सविस्तर..
मुंबई दि.११:-(वि.प्र.)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते व माजी सभापती नरहरी झिरवाळ, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष आ. श्री. शिवाजीराव गर्जे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर,माजी मंत्री अनिल पाटील,व ना.कोकाटे, धनंजय मुंडे , माजी आमदार कैलास पाटील, जळगाव जिल्हाधक्ष उमेश नेमाडे यांच्या उपस्थितीत माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाची ध्येयधोरणे, कार्यपद्धती आणि पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली. आज प्रवेश सोहळ्यात राज्यभरातून अनेक जिल्ह्यांतून पक्ष प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती त्यात बीड, व जळगाव जिल्ह्याचा खास उल्लेख ना.अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणातून केला.
पवार यांनी सर्व नवप्रवेशित सहकाऱ्यांचे राष्ट्रवादी परिवारात मनःपूर्वक स्वागत केले आणि आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अजितदादांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शिव–शाहू–फुले–आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेवर कार्यरत असून, संघटनात्मक शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख काम हेच पक्षाचे स्थिर ध्येय आहे. नव्याने पक्षात सामील झालेले सर्व कार्यकर्ते जनतेच्या विकासासाठी आणि समाजहिताच्या कार्यासाठी निश्चितच मोलाचे योगदान देतील”, असा विश्वास व्यक्त केला.
तसेच या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात नवी ऊर्जा संचारली आहे. त्यातून पक्षाला अधिक बळ प्राप्त झाले असून, आगामी काळात पक्ष जनकल्याणाच्या कार्यात अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती यांच्यासह श्री. अॅड. घनश्याम निंबाजी पाटील(माजी चेअरमन चोपडा साखर कारखाना),ताईसो सौ. इंदिराताई भानुदास पाटील(माजी व्हॉइस चेअरमन जिल्हा बँक जळगाव व माजी जिल्हा परिषद सदस्य ),श्री. चंद्रहासभाई नटवरलाल गुजराथी(चेअरमन चोपडा साखर कारखाना व चोपडा पीपल्स बँक),श्री. सुनील भाऊ जैन(व्हाईस चेअरमन पीपल बँक चोपडा व संचालक मार्केट कमिटी),श्री. अनिल भाऊ साठे(माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख चोपडा),श्री. गोकुळ आबा पाटील( माजी सभापती पंचायत समिती चोपडा),श्री. डी. पी. बापू पाटील(माजी सभापती पंचायत समिती चोपडा),श्री. शशिकांत पाटील(माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा)श्री. शशिकांत देवरे(माजी व्हाईस चेअरमन चोपडा साखर कारखाना),श्री. दिनेश देशमुख(माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा),श्री. कांतीलाल गणपत पाटील(माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा),सौ. कल्पना दिनेश पाटील(माजी सभापती पंचायत समिती चोपडा),सौ. कल्पना यशवंत पाटील(माजी सभापती पंचायत समिती चोपडा),श्री. भूपेंद्रभाई नटवरलाल गुजराथी(माजी उपनगराध्यक्ष नगरपरिषद चोपडा),श्री. विनायक रामदास पाटील(विद्यमान उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा),श्री. सुनील डोंगर पाटील(चेअरमन शेतकी संघ चोपडा),श्री. नंदकिशोर भानुदास पाटील(माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा),श्री. ललित भाऊ बागुल(माजी चेअरमन शेतकी संघ चोपडा व प्रदेश कार्यकारी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस),श्री. प्रल्हाद रघुनाथ पाटील(व्हाईस चेअरमन सूतगिरणी चोपडा),श्री. श्यामसिंग ईश्वरसिंग परदेशी(शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चोपडा),श्री. समाधान माळी(शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चोपडा),श्री. प्रफुल्ल महेंद्र स्वामी(जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव),श्री. साखरलाल महाजन(माजी सरपंच अडावद)श्री. मकसूद खा पठाण(सामाजिक कार्यकर्ता चोपडा),श्री. नईम शेख(तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस),श्री. डॉ. भरत मगन धनगर(तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चोपडा),श्री. भाऊसाहेब साळुंखे(तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय चोपडा),श्री. बाळ मुरलीधर कोळी(संचालक शेती संघ चोपडा),श्री. राजू तडवी(माजी चेअरमन विका सोसायटी मोहरद),श्री. सद्दाम अहसान अली सय्यद(माजी नगरसेवक चोपडा),श्री. इस्माईल बागवान(सामाजिक कार्यकर्ता चोपडा), श्री. रईस बागवान(सामाजिक कार्यकर्ता चोपडा) श्री. संघपाल सावते(सामाजिक कार्यकर्ता चोपडा) ,श्री. बापू खैरनार(माजी उपसभापती पंचायत समिती चोपडा),श्री. रामचंद्र भादले(सरपंच मोरचिडा)श्री. शेख उस्मान(माजी अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष चोपडा) चंद्रकांत पाटील संचालक सुत गिरणी आदिंचा समावेश आहे
