चौगांव शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी भरत पाटील

 चौगांव शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी भरत देवरे तर उपाध्यक्षपदी दीपाली पारधी 



  • चौगाव ,ता.चोपडा (प्रतिनिधी) :- येथील जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षण व्यवस्थापन समितीची दि.१०/११/२०२५ सोमवारी सकाळी ठिक दहा वाजता माजी अध्यक्ष परेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन नविन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.यात अध्यक्ष पदी भरत अभिमण देवरे यांची तर उपाध्यक्षपदी दिपाली योगेश पारधी यांची निवड करण्यात आली.
    याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण व्यवस्थापन समितीचे सचिव संतोष शिवदास सोनवणे शिक्षण व्यवस्थापन समिती सदस्य काळू राव चारण, संदिप एकनाथ कोळी, ममता नाना बारेला, दिनेश बाबुराव पाटील, कविता राहूल पाटील, देविदास योगराज राजपूत, अश्विनी नितीन पांचाळ, सुनिता वामन वडार,सतिलाल पिरण भिल, भगतसिंग भिमसिंग राजपूत, गोपाल देविदास पाटील,दिलिप सिताराम कंखरे (शिक्षक प्रतिनिधी)गुंजन गणेश पाटील व कुणाल सिताराम कोळी (विद्यार्थी प्रतिनिधी) उपस्थित होते.अध्यक्ष भरत देवरे व उपाध्यक्ष सौ.दिपाली योगेश पारधी यांच्या निवडीने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने