चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज शिव सृष्टी व आदिवासी सांस्कृतिक भवनासाठी ५ कोटींचा निधी मंजूर.. आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या प्रयत्नांना आणखीन एक" यश'"
चोपडा दि.12(प्रतिनिधी)चोपडा तालुक्याचा सर्वांगीण विकासाबरोबर शहराचाही जोरदार कायापालट कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून सदोदीत होत असून आता नुकताच चोपडा नगरपरिषद हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज "शिवसृष्टी"सभागृह उभारण्यासाठी ३ कोटी तर आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी "शिल्प रुपी" माहितीपट स्मारका करीता २ कोटी रुपयांच्या निधी, असा एकुण 5 कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथरावजी शिंदे यांनी मंजूर केला आहे.या वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे नगराच्या सौंदर्यात नाविण्यपूर्ण भर पडणार आहे.
आमदार प्रा.चंद्रकांतअण्णा सोनवणे यांनी नगरपरिषद हद्दीत मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरविकास विभागाकडे मा.उपमुख्यमंत्र्यांकडे शिवसृष्टी सांस्कृतिक सभागृह व आदिवासी सांस्कृतिक सभागृहासाठीची मागणी लावून धरली होती.त्या मागणीला मंत्री महोदयांनी मंजुरी देऊन ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.त्यामुळे नगरवासियांचे सुंदर शहर पाहण्याचे "स्वप्न" पूर्णत्वाकडे जात असल्याने आमदारांच्या कार्यांचे जोरदार स्वागत होत असून चाहत्यांची दिवसेंदिवस फौज प्रचंड संख्येने वाढत आहे.
शहराला नगराचे रुप देण्यासाठी शहरातील रस्ते, भुयारी गटारी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, आयसीयू, विरंगुळा केंद्र, शहर पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय ,मोफत नळ कनेक्शन जोडणी योजना , विविध भागात शौचालय असे एक ना अनेक काम करून शहराला नवी दिशा देण्याचे अनमोल काम त्यांनी केले आहे. या कामांमुळे शहरात सोयी सुविधांचा आमुलाग्र बदल होत असल्याने "सुंदर नगरी"च्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
