जळगाव जिल्ह्यातील शिवसेना ( शिंदे गट) नगरपरिषद प्रभारी पदाच्या नियुक्त्या जाहीर .. चोपडा,यावल व फैजपूरची जबाबदारी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे तर पालकमंत्र्याकडे ४ नगर परिषदा
चोपडा दि.१२(प्रतिनिधी) :- वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था - नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती जाहिर केल्या असून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे त्यात चोपडा,यावल व फैजपूर नगर परिषद निवडणूक प्रभारीपदी आ.प्रा.चंद्रकांतजी अण्णा सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील निवडणूक प्रभारींचे नावे व कंसात नगरपरिषद, नगर पंचायती पुढीलप्रमाणे
🗳️ पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे(वरणगाव नगर परिषद,भुसावळ नगर परिषद,धरणगाव नगर परिषद,नशिराबाद नगर परिषद),
🗳️आ.किशोर आप्पा पाटील यांच्याकडे (पाचोरा नगर परिषद,जामनेर नगर परिषद,चाळीसगाव नगर परिषद,शेंदुर्णी नगर पंचायत),
🗳️आ.अमोल पाटील यांच्याकडे ( एरंडोल नगर परिषद,पारोळा नगर परिषद),
🗳️आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडे (रावेर नगर परिषद,सावदा नगर परिषद,मुक्ताईनगर नगर पंचायत)
🗳️माजी आ.शिरीष चौधरी यांच्याकडे (अमळनेर नगर परिषद)
