राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) ४० राजकीय स्टार प्रचारकांची यादी जाहीर .. आ.अनिल पाटील व प्रतिभा शिंदे यांचा समावेश
मुंबई दि.१३ :- राज्यभरात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद, नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने प्रचारासाठी 40 राजकीय पुढाऱ्यांची स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. ती यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, पहिला मजला, नवीन प्रशासन भवन, मुंबई यांच्याकडे पाठविली आहे.
दिनांक ७ नोवेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता राजकीय पुढाऱ्यांची (स्टार प्रचारक) यांची नावे कळविणच्या सुचेना होत्या त्यानुसार
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजकीय पुढारी (स्टार प्रचारक) यांची नावे कळविण्यात आली आहेत.
त्या यादीत ना. श्री. अजितदादा पवार,खा. श्री. प्रफुलजी पटेल,खा. श्री. सुनिलजी तटकरे,ना. श्री. हसन मुश्रीफ,आ. श्री. धनंजय मुंडे,ना. श्री. नरहरी झिरवाळ,ना. श्री. माणिकराव कोकाटे ना. श्री. बाबासाहेब पाटील,ना. श्री. मकरंद जाधव-पाटील,ना. श्री. दत्तात्रय भरणे,ना. श्री. अण्णा बनसोडे,ना. कु. आदिती तटकरे,ना. श्री. इंद्रनील नाईक,आ. श्री. धर्मरावबाबा आत्राम,आ. श्री. अनिल पाटील,आ. श्री. संजय बनसोडे,आ. श्री. प्रताप पाटील चिखलीकर,श्री. नवाबभाई मलिक,श्री. सयाजीराव शिंदे,श्री. मुश्ताक अंतुले,श्री. समीर भुजबळ,आ. श्री. अमोल मिटकरी,आ. श्रीमती सना मलिक,श्रीमती रूपाली चाकणकर,आ. श्री. इद्रिस नायकवडी,श्री. अनिकेत तटकरे,श्री. झिशान सिद्धिकी श्री. राजेंद्र जैनश्री. सिद्धार्थ टी. कांबळे,श्री. सुरज चव्हाण,श्री. लहू कानडे,श्री. कल्याण आखाडे,श्री. सुनील मगरे,श्री. नाझेर काझीश्री. महेश शिंदे,श्रीमती राजलक्ष्मी भोसले,श्रीमती सुरेखाताई ठाकरे,श्री. नजीब मुल्ला,श्रीमती प्रतिभा शिंद,श्री. विकास पासलकर यांचा समावेश आहे.यात नवीन काही नावांचा समावेश होणार की नाही याबाबत पक्षाने अजून तरी स्पष्ट केलेलें विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

