चोपडा न.प.च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविषयी आवाज उठविणाऱ्या रणरागिणी प्रभाग क्रमांक १३च्या भाजप -राष्ट्रवादी युतीच्या धडाकेबाज उमेदवार सौ.संध्याताई नरेश महाजन व उमेदवार श्री.सुनील पांडुरंग चौधरी यांची दुसऱ्यांदा विजयाकडे वाटचाल..! प्रभागात भाजपाचा रुजलायं विचार..! खुद्द मतदारच करतायं प्रचार.!!

 चोपडा न.प.च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविषयी आवाज उठविणाऱ्या रणरागिणी प्रभाग क्रमांक १३च्या भाजप -राष्ट्रवादी युतीच्या धडाकेबाज उमेदवार सौ.संध्याताई नरेश महाजन व उमेदवार श्री.सुनील पांडुरंग चौधरी यांची दुसऱ्यांदा विजयाकडे  वाटचाल..!

..................................................................................

प्रभागात भाजपाचा रुजलायं विचार..! खुद्द मतदारच करतायं प्रचार.!!
...............................................


चोपडा दि.३०(प्रतिनिधी)चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 अ चे  भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी पक्ष युतीचे अधिकृत धडाकेबाज उमेदवार सौ संध्याताई नरेश महाजन व प्रभाग ब चे उमेदवार श्री.बापूसाहेब ऊर्फ सुनील पांडुरंग चौधरी यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे . आपल्या कार्याच्या ठस्याच्या जोरावर थेट मतदारांच्या हृदयावर शिक्का मारणाऱ्या त्या धडाडीच्या एकमेव उमेदवार ठरतआहेत. गतकाळात अनेक भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ख्याती  असून अधिकाऱ्यांच्या बोबड्या वळविणाऱ्या त्या एकमेव अभ्यासू व निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत. चोपडा नगरपालिकेच्या कार्यभारात गलथानपणा करणाऱ्यां विरुद्ध त्यांनी अनेकदा उठाव आणले आहेत न .पा.च्या इतिहासात प्रथमच रणरागिणी म्हणून त्यांची ओळख तयार झाली असून भ्रष्टाचाराविरुद्धचा  लढा प्रभागा पुरता मर्यादित न राहता  संपूर्ण शहरवासीयांना अवगत असल्याने त्यांच्या कार्याचा गवगवा  काना कोपऱ्यात पोहचलेला आहे. त्यांच्या या निस्वार्थ कार्याची  दखल आज रोजी  मतदारांनी घेतलेली  आहे त्यामुळे त्यांचा विजय पक्का असल्याचे मानले जात आहे. अत्यंत गरिबी व हलाखीची परिस्थिती असतांना मागील निवडणुकीत २९ उमेदवारांमध्ये  सर्वाधिक मतदान मिळविणाऱ्या एकमेव नगरसेवक ठरल्या होत्या.महाराष्ट्रभरातील अनेक  सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेत नामांकित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.एव्हढेच नवे गोरगरीब जनतेच्या आरोग्याची कठीण समस्या कोणाची उभी राहिल्यास त्या मदतीसाठी मागील नाही तर पुढील रांगेत उभ्या राहतात. ते स्वतः सर्वसामान्य परिस्थिती असतांनाही मायेचा हात देण्यात पुढे असण्याच्या त्यांच्यातील या गुणाने अनेक महिला भगिनींना डोळ्यातून अश्रूंना वाट द्यावी लागल्याचे  हृदय स्पर्शी प्रसंग आठवून मतदार राजा आपले मत त्यांच्या कुशीत टाकून विजयासाठी परमेश्वराकडे साकडे धरू लागले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक १३मध्ये कमळाची हवा जोरात आहे.त्याच्या समाजोपयोगी कार्यांत पती नरेश महाजन यांचे सहकार्य मनोभावे मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 सौ.संध्याताई महाजन ह्या सन २०१६ ते २०२१  न.प. सार्वत्रिक निवडणूकीत  प्रचंड बहुमताने नगरसेविका  म्हणून वार्ड नंबर १२ मधून निवडून आल्या होत्या .वास्तविक त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नव्हता परंतु मतदारांच्या सहकार्याने  २९ नगरसेवकामध्ये  सर्वात जास्त मताधिक्याने  निवडून येणाऱ्या त्या एकमेव आहेत.. हा चमत्कार केवळ मतदार बंधू भगिनींच्या  सहकार्याने शक्य झाले आणि  मला  जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.याही वर्षी मी 'भारतीय जनता पक्षातर्फे' अधिकृत उमेदवार म्हणून वार्ड (प्रभाग) नं. १३ मधुन निवडणूक लढवित आहे. माझी निशाणी 'कमळ' आहे. कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून मला पुन्हा प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.. 

 *सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे सर्व समाजाची व प्रभागांची खूप कामे केली  ती कामे पुढीलप्रमाणे* 

१)  रंगराव आबा नगरमधील हायटेंशन लाईन होती. ती अनेक घरांच्या वरून गेलेली होती. खूपच नागरिकांच्या जीवाला धोका होता, तत्कालीन विजमंत्री ना.मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अर्ज केला, बऱ्याच वेळा अर्ज केले. महाशयांनी माझ्या अर्जाची दखल घेतली व हायटेंशन लाईन हटवून दिली.

२) मल्हारपुरमध्ये जि.प.शाळा क्रमांक २ (दोन) ची बांधकामाची परवानगी मिळवून आणली. आपल्या पालक मंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी पहिला टप्पा ३८ लाख मंजूर करून पाठविला व दुसरा टप्पा २४ लाख २४ हजार रूपये मंजूर करून पाठविला. आज त्यांच्या सहकार्याने आठ खोल्यांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे.

३) मल्हारपुऱ्यात 'भिम नगर' मध्ये समाज मंदिराचा प्रस्ताव म. जिल्हाधिकारी साो. जळगांव यांचेकडे मंजूरीसाठी पाठविला आहे.

४) संजीवनी नगरमध्ये  २०२०-२१ मध्ये पालक मंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांचे कडून ४९ लाख रूपये मंजूर करून संजीवनी नगरमध्ये गटारींचे बांधकाम केले.

५) संजीवनी नगरमध्ये पाण्याची खूपच टंचाई होती त्या ठिकाणी लोकवर्गणीतून व स्वतःच्या मदतीने ट्यूब खोदून पाण्याची टंचाई दूर केली व रंगराव नगर कौतीक बाबा नगर येथे वाढीव पाईप लाईन टाकून पाण्याची सोय केली.

६) संजीवनी नगरमध्ये सूर्यकांत मगरे यांच्या घरापासून ते वामन मगेर यांच्या घरापर्यंत काँक्रीटकरण करून रस्त्याचे काम मा. आमदार साहेब यांच्या निधीतून पूर्ण केले.

७) डॉ.बेहडे यांच्या घरापासून ते श्री. एन. व्ही. महाजन सर यांच्या घरा पर्यंतचा रस्ता आमदार निधीतून पूर्ण केला आहे.

८) मल्हारपुऱ्यात श्री. अरूण धोबी यांच्या घरापासून ते राजेंद्र रामचंद्र माळी यांच्या घरापर्यंत रस्ता नगरपालिकेमार्फत तयार केला.

९) पाटील वाडा (मल्हारपूरा) येथील निंबाच्या ओट्याचे सुशोभिकरण केले.

१०) ओंकार नगरमध्ये श्री. संजय अग्रवाल यांच्या घराजवळील रस्ता व गटारीवर धबधबा बांधून दिला.

११) म. फुले भाजी मार्केट मध्ये स्त्रियांसाठी प्रसाधन गृह बांधून दिली. तसेच ट्यूब करून दिली

भवानी मंदिराजवळ २ वीजेचे खांब टाकले व लाईटची व्यवस्था केली. तसेच दिनेश चुनीलाल सोनार यांचे घराजवळ दोन पोल टाकले. रंगराव नगरमध्ये जवळ-जवळ ८ ते १० नविन पोली टाकले. जयवंत नगरमध्ये दोन पोल टाकले. सोने गुरूजी नगरमध्ये मोहन राजाराम माळी यांचे घराजवळ दोन पोल टाकले.

१३) डॉ. निलेश चांडक कँसर रोग तज्ञ जळगांव यांना बोलावून स्त्रियांसाठी कँसर शिबीर बोलाविले. सुमारे १०० ते १५० स्त्रियांना मार्गदर्शन केले. त्यांत दोन स्त्रियांचे सरोग निदान व त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन केले.

 समाजोपयोगी कार्यांमुळे संध्याताई महाजन यांना मिळाले विविध पुरस्कार*

१) जळगांव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अत्कृष्ट नगर सेविका म्हणून अखिल भारतीय युवा मंच व साईबाबा सांस्कृतिक मंडळ जानोरी ता. दिंडोली जि. नाशिक या संस्थेच्या वतीने पुरस्कार मिळाला.

२) प्रेरणा दर्पण फाऊंडेशन चोपडा या संस्थेमार्फत, आनंद पॅलेस येथे मराठी अभिनेता समीर चौगुले (महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम) यांचे हस्ते विशेष कामगिरी केल्याबद्दल 'प्रेरणा दर्पण पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

३) क्षत्रिय कायमाळी समाज महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात यांचे मार्फत दिनांक १६ मार्च २०२५ रोजी 'सावित्रीची लेक' हा आदर्श पुरस्कार देण्यात आला.

४) जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२५ रोजी चोपडा तालुका पत्रकार संध्यातर्फे 'आरोग्य दूत' हा पुरस्कार मिळाला.

५) घरकुल योजना प्राधान्याये रेशन कार्ड तयार करून संजय निराधार, परितक्ता, विधवा, वृध्द यांना पगार सुरू करून वरील योजनेचा लाभ मिळवून दिला.

६) गरजू मुलांना 'बालसंगोपन' योजनेचा लाभ मिळवून दिल्या बद्दल विश्व स्वामिनी मार्फत "आरोग्य दूत" पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

तरी माय बाप मतदार बंधू-भगिनींनो हे सर्व तुमच्या सहकार्य व आशिर्वादानेच  करू शकले आहे पुन्हा मला प्रभाग क्र. १३.अ  मधून प्रचंड  कमळ या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून आणा. मी तुमच्या ऋणाची परत फेड प्रभाग वासियांच्या सेवेच्या माध्यमातून करून दाखवेन अशी ग्वाही ही त्यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने