प्रभाग क्रमांक ६ मध्ये चौरंगी लढतीत सेनेच्या उमेदवार सौ.दिपाली चव्हाण यांचे पारडे जड.. प्रचाराच्या धुराळ्यात विरोधक धुव्वा धुव्वा.. अनोख्या व्हीजनने मतदार जाम खुश..*

 प्रभाग क्रमांक ६ मध्ये चौरंगी लढतीत सेनेच्या उमेदवार सौ.दिपाली चव्हाण यांचे  पारडे जड.. प्रचाराच्या धुराळ्यात विरोधक धुव्वा धुव्वा.. अनोख्या व्हीजनने मतदार जाम खुश..

चोपडा दि.30(प्रतिनिधी) चोपड्यातील प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये नगरसेवक पदासाठी अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या चौरंगी लढतीत शिवसेनेच्या उमेदवार सौ.दिपाली विनोद चव्हाण यांच्या प्रचाराच्या  फैरी वर फैरी झळकल्याने "धनुष्यबाण" जोमात तर "कमळ"  कोमात जाण्याची शक्यता मतदारांनी वर्तविली आहे.तर मशालची झळ बसल्याने  कटी पतंग होण्याचे चित्र  पाहावयास मिळेल अशी चर्चा जाणकारांतून होत आहे. आज  शिवसैनिकांनी झंझावाती   प्रचार करून विजयी पताका फडकविण्याच्या दिशेने नेली असल्याने शिवसेना गोटात आनंदाची लहर उसळली आहे .परवा अंतिम परिक्षा असून दिल्ली आता दूर नसल्याने शेवटचे चोवीस तास  प्रयत्न पराकाष्ठांची कसरत करावी लागणार आहे.

सौ.दीपालीताई चव्हाण यांनी तरूण शिक्षित तरूणांसाठी सुसज्ज वाचनालय, अत्याधुनिक जीम , महिलांसाठी मदत कक्ष, बचत गटाच्या माध्यमातून रोजगार,  शिलाई मशीन सारख्या  वैयक्तिक योजनांचा लाभ,  वयोवृद्ध आजी - बाबांसाठी  नाना नानी पार्क,रस्ते, पाणी, दिवाबत्तीआदी सुविधा व इतर समाजोपयोगी कामे हाती घेऊन प्रभागाला एक नाविण्यपूर्ण नगरी बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे.मतदारांनी त्यांच्या अनोख्या व्हीजनला प्रोत्साहन देऊन  प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे.

 आज प्रभागात  चुनारअडी, मराठे गल्ली,  परदेशी गल्ली भाट गल्ली , रथ गल्ली, गुजराती गल्ली बारी वाडा, पटवली भोकरवाडा मेन रोड, कपडे राम मंदिर परिसर भावसार गल्ली कुंभारवाडा पूर्णेश्वर महादेव मंदिर परिसर मोमीनअली आदि परिसरात प्रचार फेरी पूर्ण केली.मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आजच्या प्रचाराची मेहनत  सय्यद मजहर सय्यद जहांगीर, शेख साबीर शेख सिद्दीक गोरख कोळी सचिन कोळी आरिफ सिद्धकी ,व्यापारी कालूदादा शेख, सविता पाटील, जुबेर शेख, तोफिक शेख, अरमान खाटीक, गफार सय्यद, सुरेश बापू,सौ.लीना मनोज बडगुजर, सौ. निकिता रविंद्र बडगुजर,अल्ताफ शेख ,सय्यद अहमद अली, मुनाफ येलेकर , युनूस सय्यद, मनोज जगदीश बडगुजर, श्री रविंद्र भिका बडगुजर ,श्री जयेश मोहन बडगुजर, श्री निलेश अरुण बडगुजर ,श्री संदीप जगदीश बडगुजर, श्री राजेंद्र पुंडलिक बडगुजर, कलीम शेख, असलम शेख, साहिल शे ख, सलाम शेख, मंजूअली सय्यद, मोबीन शेख मुस्तफा, दीपक महाजन, स्वाती बडगुजर, , सौ.सुरेखा मोहन बडगुजर सौ.कल्याणी योगेश बडगुजर , श्री.प्रथमेश चव्हाण, श्री मिलिंद रमाकांत बडगुजर ,श्री सागर किशोर बडगुजर ,श्री  श्री प्रशांत मगन  युसुफ खान, मोईन शेख, नदीम शेख साबीर यांनी घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने