नगराध्यक्षपदासाठी सौ.नम्रता सचिन पाटील यांना व शिवसेना - कॉंग्रेस युतीचे सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणा.. माजी आ.सौ.लताताई सोनवणे यांचे आवाहन
चोपडा दि.१(प्रतिनिधी)कार्य सम्राट आमदार प्रा. चंद्रकांतजी सोनवणे याचा चाणक्य नीति ने चोपडा शहरातील जनतेला मुलभुत सुविधा देण्यासाठी शिवसेना कॉंग्रेस युतीचे नगराध्यक्षदाचे उमेदवार सौ.नम्रता सचिन पाटील यांच्यासह सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणा असे जाहीर माजी आमदार सौ लताताई सोनवणे यांनी केले आहे.
चोपडा नगरपालिके मार्फत संपूर्ण शहरात रस्ते, पथदिवे, स्वच्छता, कचरा उचलणे , सार्वजनिक शौचालय, चारहि दिशेला बगीचे असे अनेक योजना राबवीण्यासाठी हुषार व उच्च शिक्षित नगर अध्यक्ष पदासाठि सौ नम्रताताई सचिन पाटिल व प्रत्येक प्रभागात नगरसेवकाचा रुपात आपली सेवा करण्यासाठी पाठवत आहे आता मतदार बंधुची जबाबदारी आहे की त्याना आपण भरपुर आर्शिवाद म्हणुन धनुषबाण , पंजा आणि प्रभाग तीन मघ्ये एक छत्री या निशानीवर मतदान करुन मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा असेही त्यांनी म्हटले आहे.
सन 2025 ते 2030 पर्यंत चोपडा शहर जिल्ह्यात एक नंबर राहिल हे एक सत्य आहे. याचे उदाहरण म्हणजे चोपडा कृषि उत्पन्ना बाजार समिति आणि चोपड़ा बस स्थानक आहे.तसेच मेनरोड व शहरातील रस्तेची गेल्या १०/१५ वर्षों पासुन फार वाईट परिस्थिति होती. आता आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर बदलास सुरूवात झाली आहे.ते जेव्हा भी बोलतात,ते संपूर्ण व्हिजन तयार करुनच बोलतात. फक्त विकासाच्या गप्पा मारत नाहि. हे अनुभव जनतेला 12 /14 वर्षापासून येत आहेत तरी शहरवासियांनी विकासाचा विचार करून शिवसेना कॉंग्रेस युतीचे सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले आहे.
