चोपडा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १३अर्ज तर १५ प्रभागांकरिता नगरसेवक पदासाठी २७५ नामांकन दाखल.. उद्या छाननी
चोपडा दि.16(प्रतिनिधी)चोपडा नगरपालिका निवडणुकीत आज नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी जवळपास 275 अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी 12 अर्ज दाखल झाले आहेत. उद्या दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी छाननी होणार आहे तरी छाननीसाठी आवश्यक ती कागदपत्र उमेदवारांनी सोबत आणावेत असे आवाहन अधिकारी मनीष कुमार गायकवाड व सहाय्यक निवडणूक अधिकारी रामनिवास झंवर यांनी केले आहे.अत्यंत चुरशीत होणाऱ्या या निवडणुकीत साठी नगराध्यक्ष पदासाठी सात महिलांनी जवळपास 13 अर्ज दाखल केले आहेत.
शिवसेना शिंदे गट व काँग्रेस यांच्या तर्फे उद्योगपती रवि पाटील यांच्या सून सौ.नम्रता सचिन पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी चार नामांकन अर्ज दाखल केले आहेत तर भाजपा - अजित पवार गटामार्फत माजी नगरसेवक जीवनभाऊ चौधरी व माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा ताई जीवन चौधरी यांची सुकन्या सौ. साधना नितीन चौधरी यांनी दोन अर्ज तर स्वतः माजी नगराध्यक्षा सौ. मनीषाताई जीवन चौधरी यांनी एक अर्ज दाखल केला आहे. तसेच शिवसेना उभाठा गटाकडून शिवसेना माजी महिला जिल्हाध्यक्षा सौ.रोहिणीताई प्रकाश पाटील यांनी एक नामांकन अर्ज दाखल केला आहे. तर माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या पत्नी सौ. कविताताई रवींद्र पाटील यांनीअपक्ष म्हणून दोन नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे सौ.राजनंदनी राजेंद्र पाटील, खाटीक तब्बसुम आंबीद , दीपाली विनोद चव्हाण यांनीही प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शहराची सत्ता हाती घेण्यासाठी महिला वर्ग जोमाने कामाला लागला असून उद्या छाननीत काय चित्र पालटते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिल.

