छाननी प्रसंगी उमेदवारांनी महत्वपूर्ण कागदपत्रे सोबत आणावेत.. निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांचे आवाहन..काय आहेत कागदपत्रे वाचा सविस्तर अन् न्या सोबत..

 छाननी प्रसंगी उमेदवारांनी महत्वपूर्ण कागदपत्रे सोबत आणावेत.. निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांचे आवाहन..काय आहेत कागदपत्रे वाचा सविस्तर अन् न्या सोबत..!


चोपडादि.१६(प्रतिनिधी):-येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या पाश्र्वभूमीवर उद्या दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय नगर परिषद, चोपडा येथे उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.तरी नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड व सहाय्यक निवडणूक अधिकारी रामनिवास झंवर यांनी केले आहे.

सर्व प्रथम नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी केली जाईल.त्यानंतर प्रभागनिहाय (वार्डनुसार) नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जाची छाननी होईल

तरी संबंधित सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (प्रत्येकी एक यांनी वेळेवर उपस्थित राहावे. तसेच छाननीच्या वेळी अद्यावत मतदार यादीच्या संबंधित भागाची प्रत किंवा उमेदवार व सूचक यांचे नाव असलेल्या प्रभागाच्या / मतदार संघाच्या अद्यावत मतदार यादीतील नोंदीची प्रमाणित प्रत, वयासंबंधी समाधानकारक पुरावा, अनामत रक्कम भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत,नामनिर्देशनपत्राची पोच आणि छाननीची सूचना,अपराधसिध्दीच्या तपशिलासंबंधात आणि अपत्यासंबंधात विहित नमुन्यामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत,नामनिर्देशनाविरूध्द जो संभाव्य आक्षेप घेण्यात येईल अशा आक्षेपाचे खंडन करण्यासाठी आवश्यक असेल असा इतर कोणताही पुरावा किंवा साहित्य,राखीव जागेवर निवडणूक लढविणा-या उमेदवाराने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणापत्राच्या मूळ प्रती आदि आवश्यक कागदपत्रे सोबत आणावेत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने