चोपडा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळ चिन्हावर श्री. शुभम समाधान सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

चोपडा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळ चिन्हावर श्री. शुभम समाधान सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 चोपडादि.१६(प्रतिनिधी) : आज दि 17 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक 2025 करिता प्रभाग क्रमांक 14 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे घड्याळ या चिन्हावर शुभम समाधान सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातून COEP या कॉलेज मधून बी टेक चे शिक्षण घेतल्यानंतरच्या कालावधीत शहरात परतल्यानंतर  सतत आपल्या परिसरात जनकल्याणाकरिता सोनवणे हे लढा देत असतात. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चोपडा युवक शहराध्यक्ष या पदावर कार्य केले आहे.

 आपल्या मार्फत वार्डातील रहिवाशांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात हा मानस डोळ्यांसमोर ठेवून शुभम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.  सूचक म्हणून प्रभाग क्रमांक 14 मधून हर्षल विनायक चौधरी यांनी नाव सुचविले. अर्ज भरतेवेळी युवक नेत्तृत्व श्री. निपुन चंद्रहासभाई गुजराती,श्री. सौरभजी पवार,श्री. मंगेश पाटील,श्री. नचिकेत चौधरी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व स्थानिक परिसरातील सर्व ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने व आशीर्वादाने अर्ज दाखल केला.शुभम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना परिसरातून वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने