चोपडा नगरपरिषद निवडणूकीत ७६ नामांकन दाखल.. आज पडणार अर्जांचा पाऊस .. आतापर्यंत कोणत्या प्रभागातून ,कोणी भरला ,कुठल्या पक्षातून अर्ज वाचा सविस्तर
- चोपडा दि.१६(प्रतिनिधी) चोपडा नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी दिनांक 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत म्हणजे सहा दिवसांत 76 नामांकन अर्ज दाखल झाले असून यात शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यात आघाडी घेतली आहे .भारतीय जनता पक्षातर्फे दोन,काँग्रेस पक्षाचे दोन व तर राष्ट्रवादीतर्फे एक नामांकन दाखल करण्यात आले आहे. नामांकन दाखल करण्याची 17 नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख असल्याने याच दिवशी नामांकन अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या निवडणूकित शिवसेना (शिंदे गट) व कॉंग्रेस पक्षाची आपसात वाटाघाटी झाली असून चार जागांवर कॉंग्रेस पक्ष आपले उमेदवार देत आहे.तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी व अजित पवार गट यांनी एकत्रित येत निवडणूक लढविण्याचे जाहीर करुन आपसात उमेदवारांचे गणित ठरवून उमेदवार देत आहेत.या वाटाघाटीत भाजप पक्षाला नगराध्यक्षपद सोडण्यात आले आहे.या निवडणुकीत विशेष म्हणजे पक्षातर्फे नामांकन भरणारा एकच उमेदवार दोन किंवा तीन नामांकन दाखल करीत असून त्या उपरोक्षही अपक्षही नामांकन अर्ज दाखल करीत असल्याने नामांकन अर्ज बाद होण्याची भिती अधिक बळावल्याचे चित्र आहे.एकंदरीत ही निवडणूक अत्यंत चुरशीची व लक्ष्मी मातेचे चरण स्पर्श करुन आखाड्यात उतरण्याची होणार असल्याने मैदानात मॅच बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या प्रचंड वाढण्याचे संकेत आहेत.खेळाडूंना ग्राऊंड प्रवेश तिकीट फी जोरदार असून कसरतही प्रचंड असल्याने रसमलाई चा स्टिफन सोबत घेऊनच स्पर्धक आपला घोडा मैदानात उतरवतील. तरीही या घोडदौड स्पर्धेत टीम फायनल होणे अंतिम टप्प्यावर आहे.लवकरच रणधुमाळीचा खरा धुराळा उडायला सुरुवात होणार आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नगराध्यक्ष पदासाठी काल पर्यंत डॉ.कविता रविंद्र पाटील यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल होता.त्यांच्यासमवेत पती माजी नगरसेवक डॉ रविंद्र भास्कर पाटील हे उपस्थित होते
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
काल दि.१६ नोव्हेंबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचे नावे पक्ष प्रभाग निहाय पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक १: -प्रकाश रावण चौधरी अपक्ष, पूजा निलेश सोनवणे अपक्ष, हितेंद्र रमेश देशमुख अपक्ष ,माधुरी रामचंद्र देशमुख अपक्ष, खटाबाई अमृत पारधी अपक्ष
प्रभाग क्रमांक २: अतुल जयंत बारी (अपक्ष ),शरद बाबुराव पाटील (अपक्ष), देवयानी पवन माळी (शिवसेना), शेख नाजमीनबी रहीम (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ३: युवराज रतन अलकारी( शिवसेना व अपक्ष), ईश्वर युवराज अलकारी (शिवसेना व अपक्ष), सुनीता समाधान सपकाळे (शिवसेना व अपक्ष), वसंत बाबुराव शिंदे अपक्ष
प्रभाग क्रमांक ४: सय्यद सादिया नाज मुक्तार अली (अपक्ष ),सय्यद शिरीन बेगम उस्मान अली (शिवसेना), सय्यद आरशिन बानो ऐफाज अली (अपक्ष )
प्रभाग क्रमांक ५:-रमेश ज्ञानोबा शिंदे( शिवसेना )वैजयंताबाई रमेश शिंदे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ६: शेख मजहर सय्यद जहांगीर (अपक्ष), गजेंद्र अरविंद जयस्वाल (भाजपा व अपक्ष ),शैलेश चंपालाल जैन (अपक्ष ), राकेश वासुदेव मराठी (अपक्ष ),वैशाली मितेश भावसार (भाजपा व पक्ष)
प्रभाग क्रमांक ७: शेख अस्मा बी शेख सलमान अपक्ष कमलेश राजेंद्र बडगुजर अपक्ष
प्रभाग क्रमांक ८ :सरला प्रभाकर माळी (राष्ट्रवादी व अपक्ष )
प्रभाग क्रमांक ९:विशाल कैलास पाटील( शिवसेना), शालिनी रूपचंद पाटील( शिवसेना) अमोल साहेबराव पाटील( काँग्रेस )
प्रभाग क्रमांक १०: भारती सुनील चौधरी (शिवसेना व अपक्ष) अमोल साहेबराव पाटील अपक्ष
प्रभाग क्रमांक 11: शेख बिस्मिल्ला अब्दुल रज्जा (अपक्ष), गुजर सीमा राजेंद्र अपक्ष
प्रभाग क्रमांक 12:- प्रवीण सदाशिव देशमुख (शिवसेना अपक्ष)
प्रभाग क्रमांक १३: जयश्री दीपक पाटील( शिवसेना व अपक्ष ),संध्या नरेश महाजन (भाजपा व अपक्ष)
प्रभाग क्रमांक 14: रमाकांत नथू ठाकूर (काँग्रेस ),
प्रभाग क्रमांक 15: पंकज सुरेश बोरोले (शिवसेना) व अपक्ष
