अडावद सार्वजनिक विद्यालयात जनजाती गौरव दिवस उत्साहात संपन्न
अडावद ता.चोपडा दि१६ (प्रतिनिधी)अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी दिनांक 01 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये जनजाती गौरव पंधरवाडा निमित्ताने आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी जनजाती गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जनजाती गौरव दिवस निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांना सर्व प्रथम आदिवासी जीवनविषयक माहिती पट दाखविण्यात आले. तदनंतर भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक .. ए. जे. कदम होते. विद्यालयातील शिक्षणसेवक जीवन सिसोदे यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन कार्याबद्दल माहिती दिली. ह्या दिवसाच्या निमित्ताने विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भिंतीवर वारली कला पद्धतीने आकर्षक चित्रे काढली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती एन आर पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले
फोटो कॅप्शन अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात जनजाती गौरव दिना निमित्त शाळेच्या भित्तीवर विविध प्रकारच्या वारली चित्रे काढतांना विद्यार्थीनी
