अडावदला दोन शाळांत शालेय समिती चेअरमनपदांची निवड.. बाळासाहेब देशमुख व नामदेव पाटील यांची वर्णी
अडावद ता.चोपडा,दि.१६(प्रतिनिधी):-येथील अडावद परिसर शिक्षण मंडळ संचलित सार्वजनिक विद्यालय अडावद शालेय समितीचे चेअरमन पदी बाळासाहेब देशमुख यांची तर सार्वजनिक खाजगी प्राथमिक विद्यामंदिर अडावद शालेय समितीचेअरमन पदी नामदेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सार्वजनिक माध्यमिक शाळेच्या व्हाईस चेअरमन पदी मनोज कुमार रामराव देशमुख, सदस्य रतिलाल महाजन ,हरीश पाटील, शिक्षक प्रतिनिधी रोहिदास त्र्यंबक मोरे, शिक्षकेतर प्रतिनिधी राजेश बाविस्कर तर पदसिद्ध सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अशोक कदम यांची निवड संस्थेने केली. या निवडीबद्दल शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आणि परिसरातून सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले
