कन्या प्राथमिक विद्यालयात राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 कन्या प्राथमिक विद्यालयात राजमाता मासाहेब जिजाऊ  व स्वामी विवेकानंद जयंती साजरी 



चोपडा दि.१२(प्रतिनिधी)चोपडा येथील सद्गुरु शिक्षण मंडळ संचलित प्राथमिक कन्या विद्यालयात राजमाता मासाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाली. 

यात  शिवराय व जिजाऊ त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेत देवेंद्र चौधरी, सिध्दी पाटील, रिद्धी पाटील,लावण्या लोहार युक्ती कोळी, नेहा पाटील, कुणाल पाटील, यश चित्ते, सुजय लोहार, हर्षल पाटील, विराट सोनवणे , प्रिया पाटील.लावण्या पाटील, हे विदयार्थी सजून आलेले होते . कार्यक्रमात मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी मासाहेब जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती निता पावरा यांनी केले.  यावेळी श्याम पाटील,  प्रमोद पाटील, सुजाता पाटील ,कांता पाटील , प्रियंका चौधरी,आशा बारी, मुकेश पाटील,  पंकज पाटील बळीराम सोनवणे, निवृत्ती पाटील व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       कला शिक्षक नसताना देखील श्री. श्यामसुंदर पाटील यांनी बाल शिवराय व जिजाऊ यांचे फलक पेंट केलेले चित्र लक्ष आकर्षून घेत होते.याबद्दल उपस्थितांनी कौतुक व अभिनंदन केले.पालकांनी स्वखर्चाने आपल्या पाल्यांना वेशभूषेत सजवून छोटे संवाद पाठ करून घेतले व उपस्थिती दिली त्याबद्दल    सुजाता पाटील यांनी पालकांचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने