आज आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या उपोषणाचा नववा दिवस : प्रशासनाची मात्र बघ्याची भूमिका

 आज आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या उपोषणाचा नववा दिवस :  प्रशासनाची मात्र बघ्याची भूमिका


चोपडा दि.१२(प्रतिनिधी):  दि. 4 जानेवारी 2024 पासून शिवतीर्थ मैदान जळगाव येथे श्री. पुंडलिक सोनवणे व श्री. प्रभाकर कोळी यांच्या वतीने सुरु असलेल्या अन्नत्याग उपोषणाचा आज नववा दिवस उजाडला. तरी देखील प्रशासनाच्या वतीने अद्याप पर्यंत उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही अशी खंत उपोषणार्थींनी व्यक्त केली.

शेकडो जमात बांधवांसह काल अभ्यासक  श्री.शुभम सोनवणे, ऍड. गणेश सोनवणे व प्रा.भाऊसाहेब सोनवणे, श्री.नामदेव येळवे यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सोपान कासार यांना महसूल कागदपत्रे, तसेच उच्च न्यायालयाचे निकाल सुफूर्त करण्यात आले. सदर, पुराव्यांना जिल्ह्यातील सर्व प्रांत यांना सादर करणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी अभ्यासकांना कळविले. त्या प्रसंगी, जिल्हाधिकारी आढावा बैठकीनिमित्त तालुका दौऱ्यावर असल्याकारणाने श्री. शुभम सोनवणे यांनी त्यांच्याशी फोन वर संपर्क साधून जमातीच्या अभ्यासकासह, व जिल्ह्यातील सर्व प्रांतांसह सोमवारी अधिकृत बैठक लावण्याची वेळ मागून घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने