तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावकऱ्यांत भीती
चोपडा,दि.१९(प्रतिनिधी): तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्या दिसल्याने गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे चामुंडा माता मंदिराजवळ बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले.मात्र वनविभागाने पाहणी केली असता कुठेही बिबट्यांच्या पाऊलखुणा आढळून आल्या नसल्याचे म्हटले आहे
तावसे बुद्रुक येथील सरपंच रेखाबाई किशोर चौधरी यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली याच्या आधी देखील बिबट्या दिसल्याची माहिती सरपंच व गावातील नागरिकांनी वनविभागाला दिलेली होती असे सरपंच यांनी सांगितले पण वनविभागाने यावर गावात येऊन पाहणी केली असता त्यांना कुठल्याही प्रकारचे बिबट्याचा पायांची निशान दिसून आले नाहीत असे वन विभागाच्या सारिका कदम यांनी म्हटले आहे गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे यावर वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे असे गावातील सरपंच,पोलीस पाटील व नागरिकांनी वनविभागाकडे मागणी केली आहे गावात बिबट्या दिसल्या कारणास्तव नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी तावसे बुद्रुक,कुरवेल व खाचणे या गावातील नागरिकांनी रात्री बाहेर निघताना योग्य ती दक्षता घ्यावी असे वनविभागातर्फे कळविण्यात आले आहे.