नागलवाडी येथे मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

 

नागलवाडी येथे मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
======================


चोपडा,दि.१२(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे नागलवाडी येथे दत्त नगरचा राजा मित्र मंडळ तर्फे आयोजित राष्ट्र माता माॅ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम नागलवाडीतील प्रथम नागरिक सरपंच प्रताप शेनपडु भिल यांच्या हस्ते दत्तात्रय भगवान मंदिरात माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
वि का सोसायटीचे चेअरमन भरत रामसिंग पाटील यांनी माॅ जिजाऊ प्रतिमेस पुजन व माल्यार्पण केले तसेच गावातील मारोतीराया मंदिरात देखिल माल्यार्पण करण्यात आले स्वामी विवेकानंद प्रतिमेस छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस महाराणा प्रताप स्मारकास शहीद जवान नाना सैंदाणे यांच्या स्मारकास भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास देखिल सामुहिक माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली.
          यावेळी वि, का, सोसायटी चेअरमन भरत रामसिंग पाटील,माजी सरपंच धर्मदास नगरसिंग पाटील,विद्यमान सरपंच प्रताप शेनपडु नाईक, उपसरपंच सचिन पदमसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत गोपाल पाटील, वि, का,सोसायटी संचालक संजय मोहन पाटील, माजी सरपंच गोपाल गबा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र अभिमान पाटील, भाजपाचे धर्मदास पाटील, नितिन राजपुत,,दत्त नगरचा राजा मित्र मंडळाचे सदस्य सागर पाटील, स्वप्नील पाटील,सुनिल राजपुत, समाधान पाटील, सुधाकर पाटील, राजु पाटील, नाना सिताराम पाटील, गोपाल पाटील, अविनाश धनगर, चंद्रकांत पाटील
या सह गावातील ग्रामस्थांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने