चोपडा येथे बौद्ध महासभेने भरत शिरसाठ व गुणवंताचा अभिनंदन व सत्कार कार्यक्रम संपन्न

 चोपडा येथे बौद्ध महासभेने भरत शिरसाठ व गुणवंताचा अभिनंदन व सत्कार कार्यक्रम संपन्न

   चोपडा,दि.१३(प्रतिनिधी ):येथे नुकतेच दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल चोपडा तालुक्याच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अभिनंदन व सत्काराचा कार्यक्रम समाज मंदिर गौतम नगर स्टेट बॅक समोर चोपडा येथे आयु.बापूराव गिरधर वाणे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्राप्त  झालेल्याचा गौरव व सत्कार कार्यक्रम घेण्यांत आला. 

      यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ यांना राज्यस्तरीय आदर्श अध्यापक पुरस्कार २०२३ मिळाल्याने यांचा व १जानेवारी २०२४ रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगांव भिमा १८१८ या महायुद्धा बाबत उत्कृष्ट मनोगत व्यक्त केल्याने कु.करीना विजय शंभरकर तसेच कु.लुम्बिनी प्रविण करनकाळ यांचा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यांत आला. मान्यवरांनी सत्कारार्थी बाबत मनोगत व्यक्त केले. तसेच भारतीय बौद्ध महासभेस सुभाष भावलाल वारडे पदवीधर शिक्षक कोळंबा यांनी आपली कन्या डॉ.प्रतिक्षा हिच्या विवाह सोहळा निमित्त पाच हजार रूपये धम्मदान दिले.

      कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा.आयु.अशोक बाविस्कर(जिल्हा उपाध्यक्ष वंचित तथा नगरसेवक चोपडा)आयु.रमेश जे.पाटील(कवि, जेष्ठ पत्रकार)आयु.संतोषजिभाऊ अहिरे(सामाजिक कार्यकर्ता चोपडा)आयु.हितेंद्र मोरे माजी मुख्याध्यापक तथा जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा, सुदाम करनकाळ (माजी तालुकाध्यक्ष),शालीग्राम करंदीकर(अध्यक्ष समता सैनिक दल) प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देवानंद यशवंत वाघ यांनी केले .

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी,रमेश सोनवणे,संजय साळुंखे,सुदाम ईशी,जानकीराम सपकाळे,प्रविण करनकाळ,लखन सपकाळे, मुकुंद केदार,सुभाष वारडे,छोटू वारडे यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने