पंकज इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी...

 पंकज इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी...

 चोपडा दि.१३( प्रतिनिधी):- पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित, पंकज इंग्लिश मिडियम स्कूल चोपडा. येथे विविध सण-उत्सव साजरे करण्यात येतात. त्याचप्रमाणे १२ जानेवारी  रोजी स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व युवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक केतन माळी होते. समन्वयक गणेश साळुंखे , सौ.अनिता पाटील , सौ. रंजना तायडे  आदी उपस्थित होते.

          विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त भाषणे दिली व गीत गायन केले. तसेच, मुली जिजाऊ  आणि मुले स्वामी विवेकानंद यांच्या वेशभुषेत उपस्थित होते. सौ.सुरेखा शिरसाठ  व सौ.स्वप्नाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

  सौ.प्रणिता पाटील  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहूल पावरा ,अनिल बारेला , सौ.सुनिता सैंदाणे ,सौ.दिपाली सनांसे , सौ.निता पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने