अहो 'मुन्नाभाऊ'..! तुम्ही कर्मयोगी की धर्म योगी ... का माणूसकीचे जोगी..!!

 अहो 'मुन्नाभाऊ'..! तुम्ही कर्मयोगी की धर्म योगी ... का माणूसकीचे जोगी..!!


माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षण. आज हाच गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अनेक अशी माणसं आहेत की जी वेळप्रसंगी कसलाही मागचा पुढचा विचार न करता संकटात सापडलेल्यां अनोळखी लोकांची मदत करतात. ती मदत छोटी की मोठी, आर्थिक की मानसिक हे मुद्दे गौण आहेत. धर्म, जाती, पंथ, भाषा, वर्ण असे सारे भेद तिथे गळून पडतात.तिथे फक्त असतो तो केवळ माणुसकीचा धर्म. अनेकदा तर मदत करणाऱ्याचे नाव देखील ठाऊक नसते. तो मदत करतो आणि निघूनही जातो. हाच चांगलुपणा असतो. अश्याच चांगुलपणाने माखलेली व्यक्ती  चोपड्यासारख्या लहान शहरात  अनुभवायाल मिळाली ती म्हणजे मुन्नाभाई अग्रवाल.  यांची ओळख ही मनात भावली ती सामाजिक कामान्वये. त्यांनी अत्यंत गरजू,गरीब अन् फाटक्या तोटक्या कपड्यात वावरणाऱ्या आदिवासी विद्यार्थीनीच्या  दारिद्र्याची चाहूल मुन्नाभाऊ अग्रवाल ऊर्फ संतोष हरसाय अग्रवाल यांना कोणातरी मार्फत लागली अन् त्यांचे पाय त्या दिशेने सरसावू लागले शेवटी कमला नेहरू आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाच्या  पायरीशी येऊन थिरकले.सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यानंतर मायेचा पाझर  फुटावा मन गहिवरून यावं अशी स्थिती त्यांची झालीं अन् क्षणाचाही विलंब न करता १० किलो आंब्याच्या  रस निरागस चेहऱ्यांना खाऊ घालून  नावाप्रमाणेच मनालाही "संतोष" प्राप्त केले.त्यांनंतर काही दिवसांतच विद्यार्थींच्या फाटक्या तुटक्या कपड्यांना विराम मिळावा म्हणून त्यांनी नव्या कपड्यांच्या पिशव्या भरून आणल्या अन् कालवंडलेले चेहरे नव्याने लख्ख चमकू लागले दिवाळीचा दिवस असावा असा क्षण जादू झाल्यासाखा अचानक आल्याने  सर्व आदिवासी विद्यार्थींनी आनंदाने भारावून गेल्यात.  अशा ह्दय स्पर्शी प्रसंगाने मुन्नाभाऊ अग्रवाल यांच्या समाजोपयोगी कामांनी त्यांच्या  विचारांचा सारीपाटच जवळून पाहायला मिळाला.ईतकेच नव्हे कृष्ण कथा सप्ताहाचे आयोजन असो वा मंदिर निर्माण कार्य असो मुन्नाभाऊ अग्रवाल कधी ही ते मागे हटले नाहीत.त्यामुळे आज तरी असं वाटतंय  ते कर्मयोग की धर्म योगी हे सांगणे जरी कठीण असले तरी मात्र ते"माणुसकी झरा"नक्कीच आहेत .

हल्ली स्वार्थी युगात माणुसकी लोप पावत चालली आहे, असं आपण बहुतांशी बोलत असतो. असं असतानाही काही अनुभव येतात त्यामुळे वाटतं की, संस्काराची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. ती नष्ट होणार नाही. माणुसकीचा ओलावा अजूनही झिरपत आहे हे नक्कीच! 'लहान पण महान', असा अनुभव  मला मुन्नाभाऊ अग्रवाल यांच्या कृतीतून पाहावयास मिळाल्याने   कधी कधी वाटतं नियतीने काहींवर अन्याय केल्याचा आभास होऊन न कळत डोळ्यांतून अश्रू तरळतात.. दुसरीकडे मात्र मुन्नाभाऊंसारखे मोजके चेहरे आपुलकीचा, स्नेहाचा ओलावा देऊन जातात मग वाटत की ,"खेळ कधी कुणाला दैवाचा कळला, तूअसो, मी असो, वा कुणी असो"..

 हल्ली नको त्या ठिकाणी लोक  लाखों  रुपये देऊन दातृत्वाचा आव आणतात मात्र खऱ्याखुऱ्या गरजूंना लाथाळतात असा ही भयावह प्रकार पाहावयास मिळतो इतकेच नव्हे खोट्या शान साठी लाखोंचे समारोह करून अन्न मिठ्ठान वाया घालवतात ते अन्न न मिळणाऱ्या ना हाकलून लावतात. मात्र मुन्नाभाऊ अग्रवाल यांच्या सारखे व्यक्ती  गरजूंना ढूंढतात   आणि त्यांना मिठ्ठान्न खाऊ घालण्यात वेळ देतात त्यांच्या महान कार्यासाठी त्यांना परमेश्वर बळ देवो .ते दीर्घायुषी होवोत हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त भोले शंकराकडे मनापासून प्रार्थना..!

                शब्दांकन : श्री .महेश शिरसाठ (पत्रकार)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने