पंकज विद्यालयात रंग तरंग सांस्कृतिक महोत्सव..स्वराज्य नाटीकेचे अप्रतिम सादरीकरण

 पंकज विद्यालयात रंग तरंग सांस्कृतिक महोत्सव..स्वराज्य नाटीकेचे अप्रतिम सादरीकरण

चोपडादि.२६( प्रतिनिधी):- पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या बालसंस्कार केंद्र, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुप्त कला गुणांचा रंग - तरंग २०२३ पंकज विद्यालयात २२ ते २४ डिसेंबर रोजी संपन्न झाला. सदरील कार्यक्रमसाठी उद्घाटन कवियत्री बहिणाबाई विद्यापीठ जळगाव अधिष्टाता जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, चोपडा नपा नगरसेवक जीवन चौधरी, विभागीय संघचालक राजेश पाटील , लोक व नाट्य कलावंत विनोद ढगे, संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले , गोकुळ भोळे, गशिअ.अविनाश पाटील , सौ.हेमलता बोरोले , दिपाली बोरोले,प्राचार्य आर आर अत्तरदे, प्राचार्य मिलिंद पाटील व केतन माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

          महोत्सवात सामजिक संदेश - प्रेरणादायी आकर्षक रांगोळीचे तीन दिवस सुशोभीकरण सर्व शिक्षिका व विद्यार्थीनीनी केले. संस्थेच्या वतीने विविध समाोपयोगी कार्य करणाऱ्या १२६ मान्यवरांचा प्रमुखांच्या हस्ते स्मृती चिन्हे देऊन कार्य सन्मान केला. कार्यक्रमांत खासदार रावेर लोकसभा रक्षाताई खडसे व आमदार- चोपडा विधानसभा लताताई सोनवणे यांनी उपस्थिती देऊन उत्सवास शुभेछ्या दिल्या.सोबतच मागील वर्षी विद्यालयात आयोजित शिष्यवृत्ती व NMMS स्पर्धा परीक्षा, क्रिडा स्पर्धा, चित्रकला व संगीत यामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या एकूण ४७२ गुणवंत विद्यार्थी व पालकांचा अभिनंदन व सत्कार केला. तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार केला. कार्यक्रमांत 

विविध बालगीते, शेतकरी नृत्य, पारंपारिक गिते, श्रीराम वंदना, जोकर नृत्य, तारक मेहता का उलटा चष्मा साँग थीम, देशभक्ती गीत, कानबाई, मराठी हिंदी रिमिक्स गिते, आदिवासी नृत्य, राम अयोध्यला आ रहे, घे हरिनाम घे अशा प्रकारची विविध प्रकारच्या गितांवर विद्यार्थ्यानी धमाल नृत्य सादर केली. प्रेक्षकांची दाद मिळविली.

दि. २३ डिसेंबर रोजी शिवरायांच्या थोर कार्याचा परिचय व संस्कार विद्यार्थ्याना व्हावेत या हेतूने *स्वराज्य* नाटिका प्राथमिक विद्यालयातर्फे सादर करण्यात आली यामध्ये सुमारे १७६  विद्यार्थी व ९ शिक्षकांनी विविध महत्वाच्या भूमिका केल्या अप्रतिम अभिनय व प्रेरणादायी नृत्य, रोमांचकारी प्रसंगाने प्रचंड जनसमुदाय यांची मने जिंकली. २४ डिसेबर रोजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी *बापूचा बाला लग्नाला चला* या विनोदी नाटीकेतून प्रेक्षकांना दिलखुलास हसून लोटपोट केले. यासाठी रतन माने यांनी मार्गदर्शन केले.तीन दिवसीय उत्सवात सुमारे २४००  विद्यार्थी व शिक्षकांनी एकूण ७६  कार्यक्रमातून मनोरंजन केले. यशस्वितेसाठी सांस्कृतिक समितीतर्फे एकूण २३ विविध उपसमित्या प्राथमिक मुख्याध्यापक एम व्ही.पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक व्ही आर पाटील व सौ रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने  तयार करण्यात आल्या. त्यात संस्थेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अपार मेहनत घेतली. सूत्रसंचलन योगेश चौधरी यांनी केले.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने