*30 जुलै त-हाडी येथे कानबाई मातेचा उत्सव
त-हाडी,ता.शिरपुर( प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे): ```दुखावलेले भाऊबंदकीचे नातेसंबंध जवळ करणारी कानबाई मातेचा उत्सव त-हाडी गावाचे सरपंच जयश्रीताई धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुळशीराम भामरे सामाजिक कार्यकर्ते सुनील धनगर. त-हाडी गावाचे पोलीस पाटील प्रतापसिंग गिरासे यांच्या अध्यक्ष खाली गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळेस 30.जुलै शनिवार रोजी स्वस्तिक पूजनाचा कार्यक्रम. 31 जुलै मातेची स्थापना. 1ऑगस्टला कानबाई मातेचे विसर्जन मिरवणूक करण्यात येणार आहे. श्रावणातल्या नागपंचमी नंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई मातेच्या हा उत्सव खानदेशात साजरा होतो. त्यासाठी कोणतीही तिथी वगैरे बघितले जात नाही. कानबाई उत्सव श्रावण महिन्यात नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी प्रामुख्याने वाणी, मराठा, कुणबी , सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो. या उत्सवाच्या आधीही दिवाळी सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो. चक्कीवरून दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.
```