चोपडा शहरातील शिवाजी चौकात ग्राहक प्रबोधन कार्यक्रम संपन्न ..
चोपडा दि.२३(प्रतिनिधी): शहरातील शिवाजी चौकात जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा विभाग जळगाव , तहसील कार्यालय चोपडा आणि यावल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक प्रबोधनाचा कार्यक्रम सकाळी 11:30 वाजता संपन्न झाला.
कोळंबा तालुका चोपडा येथील गुरुदेव सेवा मंडळ यांनी वाद्यवृंदावर ग्राहक हिताची गाणी व आपले विचार नागरिकांसमोर सादर केले ग्राहकांनी वस्तू विकत घेताना काय काळजी घेतली पाहिजे ? आपली फसवणूक तर होत नाही ना ? या संदर्भात गुरुदेव सेवा मंडळाने भजन व ग्राहक उपयोगी विचार व्यक्त केले गुरुदेव सेवा मंडळाचे अशोक बाविस्कर , रघुनाथ बाविस्कर , हरिभाऊ बाविस्कर , रघुनाथ कोळी देविदास बाविस्कर , सुखदेव बाविस्कर , रोहिदास बाविस्कर , कलाबाई बाविस्कर , सुनंदाबाई बाविस्कर यांनी प्रबोधन कामी सहकार्य केले .