चोपडा तालुक्यातील ६ जि.प.गट व १२ पं.स.गणांचा अंतिम आराखडा जाहीर.. कोणत्या गटात व गणात किती गावे अन् कोण कोणती ..सविस्तर वृत्त वाचकांसाठी.
♦️सर्वाधिक प्रत्येकि २७ गावे धानोरा प्र.अ.व घोडगाव गटात..
♦️अडावद गावकऱ्यांच्या हातात पं.स. सदस्य बिनविरोध करण्याची नामी संधी..
चोपडा दि.२४(विशेष वृत्त महेश शिरसाठ) : - महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 (1962 चा महाराष्ट्र अधिनियम 5) चे कलम 58,पोट कलम २ अन्वये जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्र गणात विभागणी मसुदा करून निर्वाचक गट व गणांची संख्या निश्चित करून अंतिम प्रारूप आराखडा तयार करून घोषित करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गटाची अंतिम प्रभाग रचना करण्यात जाहीर करण्यात आली असून गट व गणांची गावनिहाय यादी घोषित करण्यात आली आहे. त्यात कोणती गावे कोणत्या गटात तर कोणती गावे कोणत्या गणात येतात याचीअंतिम घोषणा करण्यात आली आहे.त्यामुळे निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना निवडणूक मैदानाचा सराव करण्यासाठी मैदान मोकळे झाले आहे.आपला घोडा कुठून कुठल्या गावापर्यंत पळवायाचा आहे याची लक्ष्मण रेषा ठरवून घोडा मैदानात उतरावयाचे चित्र स्पष्ट झाले आहे.१२३ गावांच्या निवडणूक रिंगणात घोडगाव जि.प. गटात सर्वाधिक २७ गांवांचा समावेश असून अडावद गटात अवघ्या ९ गावांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे पंचायत समिती गणात नागलवाडी,विरवाडे व गणपुर गणात सर्वाधिक प्रत्येकि १४ गावांचा समावेश असून अडावद गणात "अडावद" हे एकमेव गाव असल्याने अडावद येथीलच पंचायत समिती सदस्य पक्का असल्याने गावपातळीवर एकजुटीने निर्णय घेतल्यास पं.स.सदस्य बिनविरोध निवडूण आणायची दोरी गावकऱ्यांच्याच हातात आहे. एकंदरीत या निवडणुकीत गावांची संख्या कमी अधिक जरी असली तरी शेवटी मतदार संख्यावळावरच उमेदवारांचे भाग्य खुलणार आहे.
सहा जि.प.गटांची नावासह कोणत्या गटात किती गावे आहेत हे पुढीलप्रमाणे
♦️ ०१ विरवाडे जि.प. गट:-* नागलवाडी ,वराड,कृष्णापुर अंगूरणे ,वैजापूर, खाऱ्यापाडाव, मुळ्याउतार, शेनपाणी, गौऱ्या पाडा ,अंमलवाडी, मोरचिडा,उमर्टी, सत्रासेन, उत्तम नगर, विरवाडे, मालापूर,विष्णापूर, बोरअजंटी, कर्जाने, मेलाने, देव्हारी,देवगड देवझिरी, बोरमडी ,
♦️ ०२ धानोरा प्र.अ.जि.प.गट:- धानोरा, मोहरद, चांदण्यातलाव, पानशेवडी, खंडणे , बिडगाव, कुंड्यापाणी ,बढई ,बढवाणी , वरगव्हाण, इच्छापुर, शेवरे बुद्रुक, खर्डी, लोणी, मंगरूळ, पंचक,रुखनखेडा प्र.अ., चांदसनी, पारगाव ,देवगाव, मितावली ,पुनगाव, पिंपरी, कमळगाव, वडगाव बुद्रुक, वटार ,सुटकार
♦️ ०३अडावद जि.प.गट:-अडावद, वर्डी, वडती, बोरखेडा, अंबाडे ,नारोद, खरद ,नरवाडे, आडगाव ,
♦️ ०४लासुर जि.प.गट:-अकुलखेडे ,घुमावल बुद्रुक, खडगाव, धनवाडी ,तावसे खुर्द ,रुखनखेडा प्र. चौ. ,माचले, घुमाल खुर्द ,काजीपुरा , चुंचाळे, कर्जाने मा ,मामलदे ,लासुर, चौगाव, मौजे हिंगोणे ,मजरे हिंगोणे ,हातेड बुद्रुक
♦️ ०५ घोडेगाव जि.प.गट :- गणपुर,मराठा, शिकावल, भवाळे ,गलंगी, धानोरा प्र.चौ. ,वेढोदा, कुसुंबा, अनवरदे बुद्रुक, दगडी बुद्रुक, मोहिदा, अजंतीसिम, वढोदा, विटनेर,घोडगाव, वाळकी ,शेंदनी, मालखेडा, अनवरदे खुर्द, बुधगाव, हातेड खुर्द,भारडू, धुपे बुद्रुक, विचखेडा, धुपे खुर्द, घाडवेल, दोंदवाडे
♦️ ०६ चहार्डी जि.प.गट:- चहार्डी,वेले, आखतवाडे,मजरेहोळ, निमगव्हाण, तांदलवाडी, खाचणे, तावसे बुद्रुक ,कुरवेल, सनपुले, गरताड, गोरगावले बुद्रुक, गोरगावले खुर्द,कठोरा, कोळंबा, वडगाव सिम, वडगाव खुर्द,भोकरी, खेडी बुद्रुक
पंचायत समितीच्या १२गणांच्या नावासह कोणत्या गटात किती गावे आहेत हे पुढीलप्रमाणे
🔲 ०१नागलवाडी पं.स.गण:- नागलवाडी, वराड, कृष्णापुर ,अंगूरणे, वैजापूर, खाऱ्यापाडाव, मुळ्यावतार, शेणपाणी, उमरटी, गौर्यापाडाव, अंमलवाडी,मोरचिडा, सत्रासेन, उत्तम नगर,
🔲०२विरवाडे पं.स.गण:- विरवाडे,मालापूर ,विष्णापुर, बोर अजंटी, कर्जाणे, मेलाने, देव्हारी, देवझिरी, देवगड ,बोरमळी
🔲०३धानोरा प्र.अ.पं.स.गण:- धानोरा प्र.अ., मोहरद, चांदण्यातलाव, पानशेवडी, खंडणे, बिडगाव, कुंड्यापाणी, बढई, बढवाणी,इच्छापुर, शेवरेबुद्रुक ,वरगव्हाण, खर्डी, लोणी
🔲०४ मंगरुळ पं.स.गण:- मंगरूळ, पंचक, रुखणखेडा प्र.अ., चांदसनी, पारगाव, देवगाव, कमळगाव, मितावली, पुनगाव, पिंपरी,वडगाव बुद्रुक, वटार ,सुटकार
🔲०५अडावद पं.स.गण :- अडावद
🔲०६ वर्डी पं.स.गण :- वर्डी, वडती, बोरखेडा, अंबाडे ,नारोद, खरद, नरवाडे ,आडगाव
🔲०७ अकुलखेडे पं. स. गण:- अकुलखेडे, घुमावल बुद्रुक, खडगाव, धनवाडी, तावसे खुर्द ,रुखनखेडा प्रचौ, माचले, घुमावल खुर्द ,काजीपुरा, चुंचाळे ,कर्जाने मा., मामलदे
🔲०८ लासुर पं.स.गण :- लासुर, चौगाव, मौजे हिंगोणे, मजरे हिंगोने, हातेड बुद्रुक
🔲०९ गणपुर पं.स.गण :- गणपुर, मराठा, शिकावल, भवाळे, गलंगी, धानोरा प्रचौ., वळोदा, कुसुंबा,अनवर्दे बुद्रुक, दगडी बुद्रुक, अजंतीसिम ,मोहिदा, वढोदा,विटनेर
🔲१०घोडगाव पं.स.गण:- घोडगाव, वाळकी, शेंदणी, मालखेडा, अनवर्दे खुर्द,बुधगाव,हातेड खुर्द , गलवाडे ,भारडू, धूपे बुद्रुक, विचखेडा ,धुपे खुर्द ,घाडवेल, दोंदवाडे
🔲११चहार्डी पं.स.गण :- चहार्डी, आहे वेले ,आखतवाडे ,मजरेहोळ, निमगव्हाण, तांदलवाडी,खाचणे, तावसे बुद्रुक
🔲१२ गोरगावले बुद्रूक पं.स.गण :- गोरगावले बुद्रुक, गोरगावले खुर्द, कुरवेल, सनपुले, गरताड, कठोरा, कोळंबे, वडगाव सिम, वडगाव खुर्द, भोकरी, खेडी बुद्रुक
जिल्हा परिषद गट गावांची संख्या
🌼 विरवाडे : २४
🌼 धानोरा प्र.अ. : २७
🌼अडावद : ०९
🌼लासुर : १७
🌼घोडगाव : २७
🌼चहार्डी : १९
.......................................
एकुण गावे : १२३
पंचायत समिती गण गावांची संख्या
🌼नागलवाडी : १४
🌼 विरवाडे : १०
🌼 धानोरा प्र.अ. : १४
🌼 मंगरूळ : १३
🌼अडावद : ०१
🌼वर्डी : ०८
🌼अकुलखेडा : १२
🌼लासुर : ०५
🌼 गणपुर : १४
🌼घोडगाव : १३
🌼चहार्डी : ०८
🌼गोरगावले बुद्रुक : ११
.......................................
एकुण गावे : १२३