*२४×७ पाणीपुरवठा योजनेचे धडाडीचे कसबी दमदार लोकसेवक , खान्देश सुपूत्र मुख्याधिकारी हेमंत निकम यांची चोपडा नवनियुक्ती..२४ किंवा २५ एप्रिलला होणार रूजू... कष्टकरी बळीराजाच्या मुलाची सेवा लाभणार कृषी प्रधान चोपडेकरांना ..!*





 *२४×७ पाणीपुरवठा योजनेचे धडाडीचे कसबी दमदार लोकसेवक , खान्देश सुपूत्र मुख्याधिकारी हेमंत निकम यांची चोपडा नवनियुक्ती..२४ किंवा २५ एप्रिलला होणार रूजू... कष्टकरी बळीराजाच्या मुलाची सेवा लाभणार कृषी प्रधान चोपडेकरांना ..!* 

चोपडा दि.२२(प्रतिनिधी) *चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्या जागी मरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा खान्देश चे सूपूत्र श्री.हेमंत आबासाहेब निकम हे येत्या सोमवारी किंवा मंगळवारी रुजू होत आहेत. उत्कृष्ट लोकसेवेने पछाडलेले कर्तव्यदक्ष,कसबी अधिकारी,२४×७ पाणीपुरवठा योजनेने मलकापूर वासियांचे मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या दमदार प्रशासन अधिकारऱ्यांचे आगमनाने चोपडेकरांना उत्कृष्ट लोकसेवेचा लाभ मिळणार आहे.त्यानिमित्ताने मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या विषयी अल्पशी माहिती जनतेच्या माहितीत्सव.*

जळगाव जसे देशाच्या नकाशावर केळी साठी प्रख्यात आहे तसेच जळगावच्या भूमीचे नाव आख्ख्या महाराष्ट्रात गाजविणारे कुशल, कर्तव्य दक्ष अधिकारी काही कमी नाहीत.आपल्या प्रतिभाशाली कुशलवंत अधिकाऱ्यांच्या यादीत खान्देश चे सुपूत्र चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी व चोपडा नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी हेमंत आबासाहेब निकम यांचें नाव घेतले जाते.टॉप ट्रेनच्या प्रथम यादीतील मित स्वभावी,मेहनती आणि जनतेला आपलेसे करणारी ह्रदयस्पर्शी व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे.ते धामणगावंचे रहिवासी,काळ्या मातीत अहोरात्र राबणाऱ्या आबासाहेब पंढरीनाथ निकम यांचे चिरंजीव आहेत.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी सामना करत मोठ्या जिद्दीने कोल्हापूर येथे बी.एस.सी.अग्री पदवी घेतल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून मुख्याधिकारी पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.

त्यांचें प्राथमिक शिक्षण चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट विद्यालयात पूर्ण केले आहे.प्रथम त्यांनी आपल्या सवेची सुरुवात धुळे महापालिकेत उत्तम रित्या केल्यानंतर मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारीपदी  विराजमान झालेत . तेथील जनतेला भेडसावणारी पाण्याची कठीण समस्या ध्यानी घेऊन "२४×७ पाणीपुरवठा योजना" हाती घेऊन मोठ्या कसबी ने यशस्वी केली.त्यामुळे मलकापूर वासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने घरा घरात पाणी पोहचल्याने मुख्याधिकाऱ्यांवर स्तुती सुमनांची उधळण केली.नंतर त्यांचा सेवेचा  प्रवास जयसिंगपुर जि.कोल्हापूर नगरपालिका,आष्टा,जि.सांगली नगरपालिका, कोल्हापूर जिल्हा प्रशासन अधिकारी, मुरगूड जि.कोल्हापूर नगरपालिका मुख्याधिकारी असा  सुरू आहे.

मुरुड  न.पा.मुख्याधिकारी असतांना श्री.हेमंत निकम साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम, स्वच्छ सर्वेक्षण, रस्ता सुशोभीकरण,दलित वस्ती डांबरीकरण, निधी अनुदान वाटप या सर्वच  विषयांवर जोरदार कामे केली.त्यातल्या त्यात  "प्लास्टिक बंदी" वर जागरूकता निर्माण करुन कापडी पिशव्या वापरण्यासाठी कॉलेज,शाळा, स्वयं सेवी संस्था यांच्याशी प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करुन प्रोत्साहित करण्याचे काम केले.

   श्री.हेमंत निकम साहेब हे चोपडा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचे सुत्र येत्या २५ किंवा २६ एप्रिल रोजी घेणार  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.त्यांच्या सेवेचा लाभ चोपडा वासियांना चांगल्याप्रकारे लवकरच मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने